
पुणे : लॉकडाऊन कालावधीत महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या आदेशांची अंमलबजावणी करताना आणि त्यातच गृहनिर्माण सोसायटीमधील काही दोन-चार सभासदांच्या बेजबाबदारपणामुळे पदाधिकाऱ्यांना सोसायटीचे आरोग्य जपताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एखाद्या सोसायटीमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळला चेअरमन, सेक्रेटरीच नव्हे तर सोसायटीतील प्रत्येकाच्या मनात धस्स होत आहे. बाजूच्या सोसायटीत एवढे रुग्ण आढळले, अशी चर्चा सध्या सुरू असते. आपल्या सोसायटीत असे काही घडू नये, यासाठी बहुतांश सोसायट्यांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर खासगी सुरक्षारक्षकांना आता चोरांपेक्षा कोरोना आत प्रवेश करणार नाही, याबाबत जास्त खबरदारी घ्यावी लागत आहे.
लॉकडाऊनमध्ये यापूर्वी काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांमध्ये चैतन्य पसरले होते. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सोसायट्यांमध्ये नियमित व्यवहार सुरू झाले होते. परंतु पुन्हा लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प झाले आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांकडून खबरदारी :
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोसायट्यांकडून प्रवेशद्वारांवर खबरदारी घेतली जात आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना मास्क बंधनकारक आहे. सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही सोसायट्यांनी थर्मल गन आणि ऑक्सीमिटरची (तपासणी यंत्र) सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गृहर्माण सोसायट्यांमध्ये घरपोच दूध, वृत्तपत्र वितरणाला परवानगी.
- नवीन भाडेकरूंना प्रवेश बंदी
- वॉकिंग, जॉगिंगला बंदी
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य
- जिम आणि स्विमिंग पूलमध्ये प्रवेश बंद
- अन्य शहरातून आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आणि घरात विलगीकरण करून (होम क्वारंटाइन) राहणे आवश्यक.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यात सोसायट्यांची भूमिका महत्त्वाची आहे. बहुतांश सोसायट्यांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ही बाब समाधानकारक आहे.
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था.
सोसायटीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व सभासदांनी पुरेशी खबरदारी घेतल्यास स्वतःच्या कुटुंबाचे आणि सोसायटीचे आरोग्य जपणे शक्य होणार आहे.
- पियुष चौधरी, कोषाध्यक्ष, गगन लॅव्हिश गृहनिर्माण सोसायटी.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.