गृहमंत्र्यांपेक्षा पोलीस अधिकारीच येतात अलिशान वाहनांत! असं कसं चालेल - अजित पवार

How can it be that only police officers come in Luxurious vehicles instead of Home Minister says Ajit Pawar
How can it be that only police officers come in Luxurious vehicles instead of Home Minister says Ajit Pawar

प्रशासकीय बैठकांमध्ये येताना अधिकारी मंडळी आलिशान वाहनं घेऊन येत असल्याचं वारंवार समोर आल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा अधिकाऱ्यांची शुक्रवारी चांगलीच कानउघडणी केली. मुंबईतल्या एका बैठकीत गृहमंत्र्यांपेक्षा काही पोलीस अधिकारीच आलिशान वाहनं घेऊन आले असं सांगत हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियमांचं पालन हे केलंच पाहिजे अशा शब्दांत त्यांना फैलावरही घेतलं. 

भाजपाच्या युवा महिला नेत्याला अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक

शहर पोलीस मुख्यालयात अनुकंपा भरती नियुक्तीपत्र व मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी पवार यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच पोलिसांशी संबंधीत विविध विषयांवर रोखठोकपणे भाष्य केलं. 

Video: नवरी एन्जॉय करत होती डान्स अन् अचानक वऱ्हाडींमध्ये घुसली भरधाव कार

पवार म्हणाले, "मुंबईतील बैठकीला काही पोलीस अधिकारी 35 लाख रुपयांच्या वाहनांमध्ये आले होते. मंत्री किंवा इतरांना वाहनं घेताना त्याची एक निमावली असते. संबंधित वाहनाविषयी माहिती घेतली असता त्यावेळी कोणत्यातरी उद्योगपतीने पोलिसांच्या ताफ्यासाठी कार दिल्या होत्या. त्यातल्या काही कार वरिष्ठ पोलिस अधिकारी वैयक्तीक वापरासाठी असल्याचे समजले. आपण शासनाचे अधिकारी असताना, एखाद्या उद्योगपतीने शासनाला भेट दिलेलं वाहनं ड्युटीवर असताना वापरावं का? ही विचार करण्यासारखी बाब आहे. काहीवेळा गृहमंत्री वेगळ्या वाहनांत फिरतात आणि पोलीस अधिकारी वेगळ्या. ड्युटीवर असताना असं करणं चुकीचं आहे. खासगी आयुष्यात कोणीही कसंही जगावं, पण ड्युटीवर असताना शासनाच्या निययांचा आदर व पालन केलंच पाहीजे'' 


सहलीचे फोटो घरी आल्यावर कुठे टाकयचे ते टाका 


कुटुंबासोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर लगेचच तिथले फोटो सोशल मीडियावर टाकू नका, चोरटे, गुन्हेगार हीच संधी साधून तुमच्या घरी चोरी करतात. फिरायला जा, पण तिथे काढलेले फोटो घरी गेल्यानंतर कुठे टाकायचे, ते टाका.


पुन्हा दागिने हरवले तर यांच्यावर कारवाई करा 


दागिने परत मिळालेल्या नागरीकांच्या दागिन्यांची पुन्हा चोरी झाली तर पोलिसांनाच तुमच्यावर कारवाई करायला सांगेल. सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी स्वतःजवळ अधिक दागिन्यांचा वापर टाळावा. घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षारक्षक, केअर टेकर यांच्यासह आपल्या परिसरात एखादा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती दिली पाहीजे, असा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी जनतेला दिला. 


रेल्वे पोलीस मजेदार असतात...


पवार म्हणाले, रेल्वेत पाकीटमार चोर असतात. तिथे पाकीट चोरी होते पण रेल्वे पोलीस एखाद्या जबाबदार व्यक्तीचे पाकीट असेल तर ते मिळवतात, हे कसं काय घडतं माहिती नाही. त्या व्यक्तीला घरी नेऊन त्याचं पाकीट दिलं जातं, त्यामुळे वेगळ्या चर्चेला वाव मिळतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com