आता स्वतःच करु शकता मतदार यादीत दुरुस्ती; पहा कसे?

How to changeYour Details in the electoral rolls
How to changeYour Details in the electoral rolls

पुणे : मतदारांना आता निवडणूक आयोगाच्या विविध अॅपचा वापर करून दुबार नावे स्वत: कमी करता येतील. मतदार यादीत नाव, छायाचित्र, पत्त्याबाबतची वैयक्तिक माहिती चुकीची नोंद झाली असल्यास त्यातही मतदारांना दुरुस्ती करता येईल.

कुटुंबातील सर्व सदस्यांची एकाच मतदान केंद्रावर नाव घेण्यासाठीची विनंती ऍपद्वारे नोंदविता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत विविध अॅप उपलब्ध करून दिलेले आहेत. अधिकाधिक मतदारांनी या अॅपचा उपयोग केल्यास मतदार यादीमधील माहिती अद्ययावत होवून मतदार यादीत सुसूत्रता येईल, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी मतदार पडताळणी कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आदी या वेळी उपस्थित होते.  


अशी करा मतदारयादीत दुरुस्ती
वोटर हेल्पलाईन ऍपमध्ये इलेक्‍ट्रोल व्हेरिफिकेशन प्रोग्राम (ईव्हीपी) म्हणजेच मतदार पडताळणी कार्यक्रम आहे. या ऍपद्वारे स्वत:ची माहिती मतदार अद्ययावत करू शकतील. नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल (एनव्हीएसपी) मोबाईल ऍपमध्येही मतदार पडताळणीची (ईव्हीपी) सुविधा आहे. तसेच, मतदार नोंदणी अधिकारी हे बीएलओ ईव्हीपी ऍपद्वारे घरोघरी भेटी देवून मतदारांची माहिती अद्ययावत करतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com