भाऊ मुख्यमंत्री होताच त्रास सुरु झाला? राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

पुण्यातील हडपसर इथं शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी भाजपवरही सडकून टीका केली.
Sanjay Raut
Sanjay Raute sakal

पुणे : राज्यात सध्या सुरु असलेल्या भोंग्याच्या राजकारणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली आहे. गेल्या पंधरा वर्षात यांना त्रास झाला नाही पण भाऊ मुख्यमंत्री होताच त्यांना त्रास कसा सुरु झाला? असा सवाल त्यांनी केला. हडपसरमध्ये शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. (How did trouble start when brother became CM harsh criticism on Raj Thackeray by Sanjay Raut)

Sanjay Raut
Photo : अमरावती ते लीलावती; नवनीत राणांचा पाहा चित्रमय प्रवास

राऊत म्हणाले, लोक सध्या पेटवापेटवीची भाषा करत आहेत. कोणी करायची पेटवापेटवीची भाषा, आमचं आख्खं आयुष्य पेटवापेटवीत गेलं. सवाल ये नही की बस्तीयां क्यो जली गई, सवाल ये है की बंदर के हाथ मे माचिस किसने दिया. बरं माचिस देऊनही ते पेटायला तयार नाही. दारुगोळा शिवसेनेकडं असताना कसा काय पेटणार? पेटण्यासाठी आतून आग असावी लागते. मनगटात धग असावी लागते. पोलीस आले तेव्हा पेटवणारे पळून गेले. हा महाराष्ट्र आंड्या-पांड्यांचा नाही, लेच्यापेच्यांचा नाही. हा महाराष्ट्र शिवसेनेचा आहे"

Sanjay Raut
जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; अंतिम अहवाल सादर

गेल्या पंधरा वर्षात ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना नेमका आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच भोंग्याचा त्रास का झाला? हा प्रश्न आहे. इतकी सरकारं आली पण कोणाला त्रास झाला नाही. विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण मग त्यांचे लाडके देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा यांना भोंग्यांचा त्रास झाला नाही. पण आपले भाऊ मुख्यमत्री झाले अन् यांना भोंग्याचा त्रास सुरु झाला. हा त्रास त्यांना पोटातून त्रास सुरु झाला आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनापासून पोटदुखीपर्यंत सर्व आजारांवर उपचार करायला सक्षम आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी थेटपणे राज ठाकरे यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com