Pune : नवे चित्रपट नसल्याने प्रेक्षक कसे मिळणार?

पुण्यातील चित्रपटगृह मालकांचा सवाल; पुर्वतयारी पूर्ण
theater
theatersakal media

पुणे : कोरोना संसर्गामुळे मागील सुमारे दीड वर्षांपासून बंद असलेली चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्यासाठी काही अटींसह आता परवानगी मिळाली आहे. याबाबत राज्य सरकारने निश्‍चित केलेल्या नियमावलीनुसार चित्रपटगृहांच्या चालकांनी चित्रपटगृहांची स्वच्छता केली आहे. ते सॅनिटाईझ करून, सुरु करण्याची पूर्ण पूर्वतयारी केली आहे. पण नवे चित्रपट कुठे आहेत. नवे चित्रपटच नसतील तर, प्रेक्षक येणार कसे, असा सवाल पुण्यातील चित्रपटगृह चालकांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने याबाबत केलेली नियमावली व घालण्यात आलेल्या अटी या चित्रपटगृहांसाठी खुपच अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत. मुळात या चित्रपटगृहाचा देखभाल व दुरुस्तीचा खर्च न परवडणारा आहे. त्यासाठी आवश्‍यक कर्मचारी वर्ग आणि यंत्रणा हीसुद्धा खर्चिक आहे. त्यातच केवळ ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्यास सांगितले आहे. यातून हा व्यवसाय कसा चालू शकेल, असा प्रश्‍न पुणे शहरातील सिटी प्राइड चित्रपटगृहाचे मालक अरविंद चाफळकर यांनी केला आहे.

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. हा आजार संसर्गजन्य असल्याने, राज्य सरकारने १२ मार्चपासून टप्याटप्याने शाळा, महाविद्यालये आणि चित्रपटगृहे बंद करण्यास सुरवात केली होती. त्यातच केंद्र सरकारने २४ मार्च २०२० पासून देशभरात लॉकडाऊन लागू केले. तेव्हापासून आजतागायत ही चित्रपटगृहे बंद आहेत.

दरम्यान, येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण त्यासाठीच्या अटी खूप त्रासदायक ठरणाऱ्या असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत राज्य सरकारने निश्‍चित केलेल्या नियमावलीनुसार ५० टक्के क्षमतेनेच चित्रपट आणि नाट्यगृहे चालविण्याचे बंधन घातले आहे. यामुळे प्रत्येक दोन प्रेक्षकांमधील एक आसन रिकामे सोडावे लागणार आहे.

"गेल्या काही दिवसांपासून नवीन चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. त्यामुळे चित्रपटगृहे सुरु केली तरी, प्रेक्षक मिळणे अवघड आहे. प्रेक्षक मिळण्यासाठी जाहिरातबाजी करून, जागृती लागणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहे सुरु झाली तरी त्यातून चित्रपटगृह मालकांना आणि चालकांना फारसा फायदा होणार नाही, साधारणतः दिवाळीनंतर चित्रपटगृहे चांगल्या पद्धतीने चालू होऊ शकतील, अशी आशा आहे."

- अरविंद चाफळकर, सिटी प्राइड चित्रपटगृह मालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com