कामगार दिन स्पेशल : लॉकडाऊनमध्ये कामगारांपुढे आहे 'हेच' एकमेव ध्येय!

Workers
Workers

पुणे : किरकोळ वस्तूंपासून मोठ-मोठे यंत्र बनवणारे उद्योग आणि त्यावर अवलंबून असणारे इतर किरकोळ व्यवसाय हे सध्या लॉकडाउनमुळे ठप्प आहेत.

या सर्वांचा आर्थिक फटका बसल्याने आता कर्मचारी कपातीचे धोरण राबवले जात आहे. त्यामुळे आपली नोकरी कशी टिकवायची हे एकमेव ध्येय कामगारांपुढे आहे. तर असंघटित कर्मचाऱ्यांना त्याहून भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र कामगार दिनी प्रकर्षाने दिसते.

- पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

पुणे शहर आणि परिसरात दररोज लाखो संघटित आणि असंघटित कामगार कामाच्या ठिकाणी हजर असतात. मात्र लॉकडाऊननंतर हे सगळे चित्र बदलले असून यापुढे कामाचे स्वरूप आणि कंपन्यांची ध्येयधोरण यात आमूलाग्र बदल होतील आणि त्यातून कामगारांच्या समस्या वाढू शकतात, असा अंदाज कामगार क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

कोरोनाचा सर्वाधिक फटका कामगार आणि कष्टकऱ्यांना बसत आहे. असंघटित कामगारांची स्थिती त्याहून भयंकर आहे. त्यामुळे या पुढील धोरणे आखताना सरकारने कर्मचाऱ्यांना केंद्रबिंदू ठेवले पाहिजे. महामारी ने मरायचे की उपासमारीने अशी वेळ आली तर लोक महामारीला निवडतील अशी स्थिती आहे. या सर्व स्थितीचा विचार करून कामगारांना पुरेशी मदत केली पाहिजे.
- अजित अभ्यंकर, अध्यक्ष, बांधकाम कामगार संघटना

औद्योगिक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना विमा आणि सुरक्षेच्या बाबी पुरविणाची जबाबदारी घेतली पाहिजे. हे सर्व कर्मचारी कामावर जाण्यास तयार आहेत. कोरोनामुळे कोट्यावधी नोकरदार बेरोजगार होणार आहेत. असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या त्यात मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका  नसलेल्या ठिकाणी सर्व खबरदारी घेऊन कंपन्या सुरू करता येऊ शकता. 
- डॉ. रघुनाथ कुचिक, शिवसेना कामगार नेते

जगावं कसं असा प्रश्न असंघटित कामगार आणि बांधकाम मजुरांपुढे आहे. त्यांना मदत करण्यासाठी सरकारची कोणतीही ठोस रणनीती नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहे. कामगारांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या मंडळांचा निधी या वेळी नाहीतर कधी कामी येणार. हातावर पोट असलेल्या कामगार व किंवा अन्नधान्य मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
- बस्तू रेगे, अध्यक्ष, दगडखान कामगार संघटना

आयटी कंपन्यांचे प्रोजेक्ट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेले असतात. मात्र कोरोनामुळे परदेशातुन येणारे प्रोजेक्ट थांबले आहेत. पुरेसे काम नसल्याने कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. त्यामुळे नोकरी टिकवणे हा एकमेव उद्देश आता आयटी कर्मचाऱ्यांच्या पुढे आहे. आयटी कर्मचाऱ्यांनी आपले हक्क काय आहे याची माहिती करून घ्यावी. अन्याय झाला तर एकत्र येऊन त्याविरोधात लढा देता आला पाहिजे. 
- पवनजीत माने, राज्य अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉयी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com