पुणे : आत्तापर्यंत किती नागरिकांनी ‘सारथी’ला भेट दिली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पिंपरी - विविध विभागांकडील नागरी सेवा, सुविधांबाबतची माहिती नागरिकांना तत्काळ उपलब्ध व्हावी, यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी १५ ऑगस्ट २०१३ रोजी ‘सारथी’ हेल्पलाइनची मुहूर्तमेढ रोवली. आत्तापर्यंत ‘सारथी’ला भेट देऊन माहिती प्राप्त करून घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येने पंधरा लाखांचा टप्पा पार केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘सारथी’ कशासाठी
    साप्ताहिक व सार्वजनिक सुटीच्या दिवसांसह सातही दिवस चोवीस तास आवश्‍यक माहिती
    दैनंदिन प्रश्‍नांचे निराकरण, महापालिका सेवांव्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व सरकारच्या विविध सेवा, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शिधापत्रिका, मतदार नोंदणी इत्यादी सेवा
    एमआयडीसी, नवनगर विकास प्राधिकरण, महावितरण, आरटीओ अशा विविध विभागांच्या सेवांबाबतची माहिती.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाच नद्यांच्या पाण्याने अभिषेक

विविध सेवा व तक्रारींच्या निराकरणाबाबत नागरिकांनी हेल्पलाइन व दूरध्वनीद्वारे समाधान व्यक्त केले आहे. ‘सारथी’ प्रकल्पास यापूर्वी राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धाअंतर्गत दहा लाखांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व माहिती तंत्रज्ञानाचा सुनियोजित उपयोग करून नागरी सुविधा देण्याबाबतचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. गेल्या सहा वर्षांत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांनी ‘सारथी’ला भेट दिली आहे.
- नीळकंठ पोमण, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, महापालिका

‘वेब लिंक’चा उपयोग
    वेब लिंकद्वारे उपलब्ध सारथी पुस्तिका संगणक, आयपॅड, टॅब याद्वारे वाचणे व त्यामधील आवश्‍यक माहिती शोधणे, उपलब्ध करून घेणे, सहजतेने हाताळणे सोयीचे होण्यासाठी सारथी ई-बुक उपलब्ध

बहुभाषकांना फायदा
    बहुभाषकांच्या सोयीसाठी सारथीद्वारे उपलब्ध सर्व सेवांची माहिती, सारथी पुस्तिका, वेबलिंक, मोबाईल ॲप्लिकेशन, ई-बुक इत्यादी उपलब्ध
    आत्तापर्यंत पाच लाख दोन हजार ५८६ नागरिक लाभार्थी

प्राप्त तक्रारी - १,६५,७५९
निराकरण - १,६०,७८७
टक्केवारी - ९७ टक्के

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How many citizens have visited Sarathi so far