esakal | आजाराला घाबरून कसं चालेल?
sakal

बोलून बातमी शोधा

Rajeshwar Lonikar

आजाराला घाबरून कसं चालेल?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘आजाराला घाबरून कसे चालेल... थोडे धैर्य दाखविले तर आपण त्यातून सहीसलामत बाहेर पडतो. अर्धांगवायूचा त्रास असलेली माझी बायको आणि मुलगा आम्ही तिघेही यातून मानसिक लढ्याच्या जोरावरच यातून बाहेर पडलो...’’ सत्त्याहत्तर वर्षांचे आजोबा राजेश्वर लोणीकर सांगत होते.

लोणीकर यांना गेल्या महिन्यात अशक्तपणा खूप जाणवत होता. फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी औषधे घेतली. परंतु अशक्तपणा कमी होत नव्हता आणि भूकही कमी झाली. तीच लक्षणे त्यांची पत्नी रोहिणी (वय ७२) आणि मुलगा अरुण (वय ४९) यांच्यामध्ये दिसली. तिघांची कोरोना तपासणी केल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. रोहिणी यांना सात वर्षांपासून अर्धांगवायूचा त्रास आहे. त्यामुळे सर्वांना काळजी वाटली. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिघेही गृहविलगीकरणात राहिले.

हेही वाचा: लॉकडाउनमध्येही आयटी कंपन्यांचे 'उद्योग'सुरूच

लोणीकर म्हणाले, ‘‘सुरुवातीला माझ्यापेक्षा पत्नीची काळजी वाटली. माझी मुलगी डॉक्टर असून तिने आम्हाला धैर्य दिले. घरातच एका रूममध्ये आम्ही तिघे राहायला लागलो. पत्नीला फार व्यायाम करणे शक्य नसल्याने मी आणि माझ्या मुलाने दररोज निर्धाराने व्यायामाला सुरुवात केली. माझा अनेक वर्षांपासूनचा चालण्याचा नित्यक्रम होता, त्याला थोडा मोडता घातला आणि रूममध्येच शक्य तेवढे चालणे ठेवले. अशक्तपणामुळे ते फार जमत नव्हते. त्यावर उपाय म्हणून श्वासाचे व्यायाम सुरू केले. आठ-दहा दिवसांनंतर जरा बरे वाटायला लागले.’’

अशी घ्या काळजी

  • जास्त वयामुळे घाबरू नका

  • सकारात्मक विचार ठेवा

  • धीम्या गतीने श्वासाचे व्यायाम करा

  • गरज असेल तरच बाहेर पडा

loading image