आधी पगार, मग उपचार! कोरोनाग्रस्त HR चं 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल बेड'

ICU bed
ICU bedSakal

पुणे : सध्या कोरोनाबाधितांची(Corona Positive) संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरात जवळपास सर्व हॉस्पिटल- कोविड सेंटरमध्ये(Covid Center) रुग्ण दाखल केले जात आहेत. या रुग्णांच्या सेवेत कोरोना योद्धे दिवसरात्र झटत आहे. कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरा होऊन घरी परतावा यासाठी डॉक्टर- नर्सेस सोबतच हॉस्पिटल- कोविड सेंटरमध्ये काम करणारा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. शहरातील विविध कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून, शहरातून हे सर्व कर्मचारी आले आहेत. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात दिवसरात्र काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना किमान महिन्याचा पगार (Salaries)वेळेत मिळावा एवढीच अपेक्षा असते. पुण्यातील एका कोविड सेंटरचे काम पाहाणाऱ्या एचआर मॅनेजर(HR Manager) कोरोना बाधित झाल्या आणि त्यामना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार कसा मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण अशा अवस्थेतही एचआर मॅनेजरने थेट हॉस्पिटलमधील बेडवर बसूनच 500 कर्मचाऱ्यांना पगार दिला. (hr manager from pune paid salaries of workers from hospital bed)

ICU bed
आली समीप लग्न घटिका...

अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जंम्बो कोविड 19- युनिटमध्ये हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत गेल्या वर्षभरापासून वैशाली हांडे या एचआर मॅनेजर म्हणून काम करत आहेत. एका आठवड्यापुर्वी त्यांनी ताप, सर्दी आणि आणखी काही कोरोनाची लक्षणे दिसून आली. आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर त्या कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना होम क्वारटाईन होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. वैशाली यांचे पतीही त्याच सेंटरवरील आयसीयू व्यवस्थेचे काम पाहातात. वैशालीं यांचा ताप वाढत असल्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास सांगितले. वैशाली यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले पण त्याच काळाता कोविड सेंटरमध्ये काम 500 करणाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगार देण्याचे काम राहिले होते. कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळावा यासाठी त्यांनी हॉस्पिटलमध्येच काम सुरु केले. आराम करण्याऐवजी बेडवरच बसून त्यांनी लॅपटॉप घेऊन कर्मचाऱ्यांच्या पगार देण्याचे काम पूर्ण केले.

ICU bed
प्रवासी वाहतुकीसाठीही आता ‘ऑल इंडिया परमिट’; ८ लाख बस व्यावसायिकांना दिलासा

''प्रत्येक महिन्यात 10 ते 15 मे दरम्यान पगार वाटपाचे काम करावे लागते. पण यावेळी याच कालावधीदरम्यान मला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. वेगळ्या राज्यातून, शहरातून कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पगार अत्यंत महत्तवाचा असतो. त्यामुळे वेळेत त्यांना पगार मिळणे गरजेचे होते."' अशी माहिती वैशाली यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com