बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरवात | HSC Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online registration
बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरवात

बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरवात

पुणे - राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया शुक्रवार (ता.१२) पासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेतल्या जाणाऱ्या या परीक्षे संदर्भात विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

बारावी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसच्या माध्यमातून २ डिसेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर १३ डिसेंबर पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल. व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शाखेच्या नियमित विद्यार्थी, पुनरपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी खासगी आणि तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया ३ डिसेंबर ते ११ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या विद्यार्थ्यांना २० डिसेंबर २०२१ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करु शुल्क भरण्यासाठी १२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

हेही वाचा: 'MBBS'च्या शंभर जागांना आयोगाची मंजुरी

विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन सबमीट केल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगिनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती रजिस्टारसोबत पडताळण्यात यावी. माहिती अचूक असल्याची खात्री करावी आणि विद्यार्थ्यांची सही घ्यावी असे निर्देश शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन स्वतंत्र चलनाद्वारे शुल्क भरावे. शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बॅंक खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत आणि विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत संबंधित विभागाकडे सादर कराव्या अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

loading image
go to top