बारावीच्या फेरपरीक्षेचा निकालात सलग तिसऱ्या वर्षी घट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - बारावीच्या फेरपरीक्षेसाठी एक लाख दोन हजार 160 विद्यार्थी बसले होते. त्यातील 23 हजार 140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. फेरपरीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 22.65 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 2.31 टक्‍क्‍यांनी घटला आहे. बारावीच्या फेर परीक्षेच्या निकालात सलग तीन वर्षे घट होत आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये घेतलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून फेर परीक्षेसाठी एक लाख दोन हजार 314 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विविध शाखांच्या 131 विषयांची फेरपरीक्षा घेण्यात आली. जुलै-ऑगस्ट 2018मध्ये बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयासाठी बहुसंची प्रश्‍नपत्रिका योजना राबविण्यात आली. परीक्षा कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके नेमली होती. मात्र, तरीही फेरपरीक्षेतील कॉपीचे प्रमाण तुलनेने अधिक होते. 

- गुणपडताळणीसाठी अर्जाची मुदत : 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 
- उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्जाची मुदत : 27 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 
- उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन : छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसांत अर्ज करणे अपेक्षित 

विभागीय मंडळ : प्रविष्ट विद्यार्थी : उत्तीर्ण विद्यार्थी : उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 
पुणे : 19,933 : 4,141 : 20.77 
नागपूर : 11,084 : 2,828 : 25.51 
औरंगाबाद : 8,027 : 2,288 : 28.50 
मुंबई : 29,057 : 5,600 : 19.27 
कोल्हापूर : 8,108 : 2,103 : 25.94 
अमरावती : 7,343 :1,574 : 21.44 
नाशिक : 12,454 : 2,780 : 22.32 
लातूर : 5,207 : 1,639 : 31.48 
कोकण : 947 : 187 : 19.75 

Web Title: HSC exam results decreased