गोंधळू नका, घाबरू नका...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

पुणे - भविष्यातील विविध शैक्षणिक क्षेत्रे खुली करणारी बारावीची वार्षिक परीक्षा आजपासून सुरू झाली. पहिला पेपर इंग्रजीचा झाला. पहिलाच पेपर असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पालकांनी आपल्या मुलांना विविध परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी गर्दी केली होती.

पुणे - भविष्यातील विविध शैक्षणिक क्षेत्रे खुली करणारी बारावीची वार्षिक परीक्षा आजपासून सुरू झाली. पहिला पेपर इंग्रजीचा झाला. पहिलाच पेपर असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पालकांनी आपल्या मुलांना विविध परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी गर्दी केली होती.

पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने गोंधळू नको, घाबरू नको, शांतपणे पेपर सोडव, अशी आधारवाक्‍ये पालकांकडून दिली जात होती. शाळांनीदेखील विद्यार्थ्यांचे स्वागत आणि त्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केले होते. पेरुगेट भावे हायस्कूलने विद्यार्थ्यांचे औक्षण केले. त्यांना खडीसाखर देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव बी. के. दहिफळे आणि सहायक सचिव अनिल गुंजाळ, शाळेच्या मुख्याध्यापक के. एन. अरनाळे यांनी मुलांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. 
आपटे प्रशालेनेही विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका ट्रिझा डेव्हिड यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. परीक्षा केंद्रावर मुलांना सोडण्यासाठी आणि परीक्षा झाल्यानंतर मुलांना नेण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. पहिलाच पेपर असल्याने तो झाल्यानंतर विषय शिक्षकांना दाखविण्यासाठी मुलांची धावपळ सुरू होती. विविध परीक्षा केंद्रावर पेपर सोपा असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी देत होते.

ऑल द बेस्ट
मुलांनी झालेल्या पेपरचा विचार करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या.
विद्यार्थ्यांनी फार जागरण करू नये; त्याचा अभ्यासावर दुष्परिणाम होईल.
पालकांनी नकारात्मक विचार करून, मुलांशी गुणांबाबत चर्चा करू नये, 
भविष्यातील जेईई, सीईटीचा विचार करू नका.
अभ्यासात जेवढे चांगले जमतेय आहे, त्यावर भर द्या. 
अभ्यासातील काही गोष्टी जमत नसतील, तर त्याचा फार विचार करू नका.
विषय बदलला, माध्यम बदलले, केंद्र बदलले त्याचा ताण घेऊ नका.
प्रवेशपत्र हरविले वा कोणतीही अडचड आली, तर केंद्रप्रमुख तुमच्या मदतीसाठी तयार आहेत.
परीक्षेचा ताण वाटत असेल, बोर्डाने नेमलेल्या समुपदेशांशी संपर्क साधा.
आनंदाने परीक्षेला सामोरे जा. परीक्षा कशी असते, याचा अनुभव आणि मजा घ्या.

Web Title: hsc exam start