उद्योगनगरीच्या मुलीच हुश्‍शार...

HSC-Result
HSC-Result

पिंपरी - चिंचवड शहराचा निकाल ८९.०९ टक्के; सोळा विद्यालयांचा निकाल शंभर टक्के
पिंपरी - शहराचा बारावीचा निकाल ८९.०९ टक्के लागला असून, विविध कनिष्ठ महाविद्यालयांतून परीक्षेला बसलेल्या सतरा हजार ४७४ विद्यार्थ्यांपैकी पंधरा हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलींचाच टक्का अधिक आहे. उत्तीर्ण झालेल्या मुलांची ८५.८४ व मुलींची टक्केवारी ९३.०१ आहे. त्यामुळे उद्योगनगरीच्या मुलीच हुशार असल्याचे सिद्ध झाले आहे. यंदा सोळा महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून, रूपीनगरमधील ज्ञानेश्‍वर माध्यमिक ज्युनियर कॉलेजचा निकाल सर्वाधिक कमी ५४ टक्के लागला.

बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंगळवारी (ता. २८) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला. निकालाची सकाळपासूनच मुलांमध्ये उत्सुकता होती. इंटरनेटवर दुपारी एक वाजता जाहीर होताच इंटरनेट ॲक्‍सेस सुरू झाल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या अनेक साइटवर इंटरनेट ‘ट्रॅफिक जाम’ झाले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका सात दिवसांनी शाळांना देण्यात येणार आहे.

पंधरा हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण 
शहरातील ८१ महाविद्यालयांमधून १७ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी प्रथमच परीक्षेला बसलेले पंधरा हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांत मुलींची संख्या सात हजार ३७४ , तर मुलांची संख्या सहा हजार १९४ आहे.  

पुनर्परीक्षार्थींचा टक्का घसरला
यंदा पुन्हा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल २०.४१ टक्के लागला आहे. ६९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ६९१ जणांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली, त्यापैकी १४१ जण उत्तीर्ण झाले आहेत. यात ५१८ मुले तर १७१ मुलींनी परीक्षा दिली. परंतु ९२ मुले आणि ४९ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी १७.२६ असून, २८.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी त्यांचा ३८.३५ टक्के निकाल लागला होता. त्या तुलनेत पुनर्परीक्षार्थींच्या निकालात घट झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com