HSC Result 2020: निकाल लागला, चांगले गुणही मिळाले; पण सेलिब्रेशन झालं 'मिस'!

HSC_Students
HSC_Students

पुणे : कधी एकदाचा बारावीचा निकाल लागतोय आणि आपण मस्तपैकी पेढे वाटतोय, कुटुंबियांबरोबर आनंद साजरा करतोय, एवढचं काय, मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन सेलिब्रेशनची पार्टी देखील देतोय असे होऊन जाते, पण यंदा मात्र हा आनंद चार भिंतीतच साजरा करावा लागला. निकाल लागल्यावर यावेळी ना पेढे होते, ना सेलिब्रेशनची पार्टी, 'सब कुछ सुना सुना सा था', कारण यंदाच्या बारावीचा निकाल लागला तोच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील 'लॉकडाऊन'मध्ये. मग कसला आलाय आनंद अन् कसली आलीय पार्टी!

बारावीच्या परीक्षेसाठी ज्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला, नियोजनपूर्वक पेपर सोडविले आणि आपला 'रिझल्ट' कसा असेल, हे घरच्यांना पटवूनही दिले, ती मंडळी निकाल लागल्यानंतर नेमके कसे एन्जॉय करायचे हे ठरविण्यास तरी कशी विसरतील बरं. आत्तापर्यंत घरात ताई-दादा किंवा शेजारच्या ताई-दादाचा निकाल लागल्यानंतरचा आनंदोत्सव 'याची देही याची डोळा' पाहिल्याने आपणही आपला बारावीचा निकाल लागल्यानंतर तसेच पेढे आणायचे, कुटुंबाबरोबर आनंद साजरा करायचा, त्यानंतर मित्र- मैत्रिणींबरोबर चौपाटीवर जाऊन भेळ, पाणीपुरी, आइस्क्रीमवर यथेच्छ ताव मारायचा, असे एकूण गणित अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपापल्या मनात करुन ठेवले होते.

एवढे सगळे नियोजन केले, पण कोरोनाने त्यांच्या आनंदावर विरजण पाडले. सेलिब्रेशन, पार्टी वगैरे जाऊ द्या हो, किमान पेढे तरी वाटता आले असते, पण कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असल्याने सगळेजण आपापल्या घरातच बसून राहिले. बरं निकाल ऑनलाइन पाहिला, चांगले टक्के देखील मिळाले, पण हा आनंद साजरा करता आला नसल्याची भावना बारावी उत्तीर्ण झालेल्याच्या मनात होती. एकूणच कोरोनाने बारावीच्या निकालाचा आनंद ही त्यांना 'सेलिब्रेट' करू दिला नाही. मात्र यातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढत अनेकांनी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्या ऑनलाईन भेटी घडवून आणत निकालाचा आनंद साजरा केला. यंदाचे हे सेलिब्रेशन पेढ्यांविना झाले असले तरीही घरात केक, शिरा असे काही स्पेशल बनवत अनेकांनी घरातल्या घरात हा आनंद साजरा केला.

शहरातील प्रमुख शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील निकाल

महाविद्यालयांचे नाव : एकूण निकाल : शाखानिहाय निकाल : पहिले तीन क्रमांक पटकाविलेले विद्यार्थी

- फर्ग्युसन महाविद्यालय : ९८.०९ टक्के  
विज्ञान शाखा- सेरा गांधी, सोहमिका वाधवा (९४.७६ टक्के), इशा चिपळूणकर, ओमकार नवलगावकर (९४.३ टक्के), रेवती कुलकर्णी (९४.१५ टक्के)

कला शाखा- अमेय बलसरा (९५.६९ टक्के), ऐश्वर्या गाडगीळ (९५.३८ टक्के), स्वराली गांगुर्डे (९५.०७ टक्के)

- सर परशुराम महाविद्यालय : ९५.१० टक्के :

विज्ञान- ९४.८ टक्के, कला- ९३.३६ टक्के, वाणिज्य- ९६.३३ टक्के

- एच.व्ही. देसाई महाविद्यालय : ९८.४४ टक्के  

विज्ञान- ९८.८६ टक्के, वाणिज्य-९८.२९ टक्के 

- अबेदा इनामदार ज्यूनिअर कॉलेज : ९६.२५ टक्के 

विज्ञान- ९७.५४ टक्के, कला-८९.३३टक्के, वाणिज्य-९६.१५ टक्के, एमसीव्हीसी-९२.५३टक्के

- अँग्लो ऊर्दू बॉइज हायस्कूल, ज्यूनिअर कॉलेज : ८८.४७ टक्के

विज्ञान- ९४.४७ टक्के, कला- ४८ टक्के, वाणिज्य- ९०.६१टक्के

- मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स : 

विज्ञान- ९२.१० टक्के, वाणिज्य- ९६.२२ टक्के, एमसीव्हीसी- ९२.०३ टक्के

- डॉ. कलमाडी श्यामराव ज्यूनिअर कॉलेज : ९६.०१ टक्के : विज्ञान- ९७.६० टक्के, वाणिज्य- ९२.३० टक्के :

विज्ञान शाखा- ओम गोडबोले (९४.१५ टक्के), रोहन दोषी (९३.५५ टक्के), साहिल भागवत (९३.५४टक्के) 

वाणिज्य शाखा- इशिका सरदेशमुख (९६टक्के), कृती पारिख (९२.६२टक्के), धनराज जाधव (९१.५३ टक्के)

- मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर :
- विज्ञान- ८७.४४ टक्के, वाणिज्य- ९४.९४ टक्के, कला- ७७.१६ टक्के

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com