HSC Result 2020 : पुण्याने नाही, तर 'या' जिल्ह्याने मारली बाजी; पाहा सविस्तर निकाल!

HSC_Students
HSC_Students

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत पुणे विभागाचा निकाल ९२.५० टक्के लागला आहे. या विभागात सोलापूर जिल्ह्याचा सर्वाधिक ९३.७४ टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल पुणे जिल्ह्याचा ९२.२४ टक्के असा निकाल आहे. तर नगर जिल्ह्याचा निकाल ९१.९७ टक्के आहे.

पुणे विभागातून दोन लाख ४० हजार ६९७ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील दोन लाख २२ हजार ६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९२.५० आहे. या परीक्षेस १३ हजार २५९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातील चार हजार ५१९ विद्यार्थी उत्तीर्णतेच्या निकालाची टक्केवारी ३४.०८ आहे. नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेच्या एकूण टक्केवारी ८९.४५ टक्के आहे.

जिल्ह्यानुसार निकालाचा आढावा :

जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या परीक्षा दिलेले नियमित विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
पुणे ७२२ १,२३,६५५ १,१४,०५६ ९२.२४
नगर ४३४ ६३,५१३ ५८,४१२ ९१.९७
सोलापूर ४१० ५३,५२९ ५०,१७८ ९३.७४ टक्के

विभागाचा शाखानिहाय निकाल (टक्केवारीत) :

शाखा पुणे नगर सोलापूर
विज्ञान ९७.५७ टक्के ९८.०१ टक्के ९८.४९ टक्के
कला ८०.८७ टक्के ८०.६१ टक्के ८७.९६ टक्के
वाणिज्य ९२.२० टक्के ९४.५५ टक्के ९५.४२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम ८९.३९ टक्के ८५.२० टक्के ८९.०७ टक्के

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील निकालाचा आढावा:

परिसर परीक्षा दिलेले विद्यार्थी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी निकालाची टक्केवारी
पुणे शहर (पश्चिम भाग) २६,५७९ २४,२७९ ९१.३५ टक्के
पुणे शहर (पूर्व भाग) २२,२३१ २०,०७९ ९०.३२ टक्के
पिंपरी-चिंचवड १७,३०५ १६,१८६ ९३.५३ टक्के

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com