
High-Security Number Plate: पुणे उप प्रादेशिक परिवहन विभागानं (Pune RTO) जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (HSRP) लावण्यासाठीच्या केंद्रांत वाढ केली आहे. आरटीओने दिलेल्या मुदतीच्या दिवसात घट होत असून, नोंदणीधारकांच्या प्रतीक्षेचा कालावधी ३० दिवसांहून अधिक आहे. त्यामुळं डेडलाईनच्या आतमध्ये या नंबर प्लेट बसवून व्हाव्यात यासाठी केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसंच या नंबर प्लेटसाठी किती खर्च येतो? यासाठी नोंदणी कशी करायची? तसंच नोंदणीनंतर कधीपर्यंत ही नंबर प्लेट मिळेल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.