
Maharashtra HSRP Number Plate : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेटच्या दरांबाबत सध्या महाराष्ट्रात बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या परिवहन विभागानं नुकताच या नंबर प्लेटच्या दरांबाबत खुलासा केला. पण हा खुलासा देखील जनतेची दिशाभूल करणारा असल्याचं ई-सकाळच्या तपासणीत उघड झालं आहे.
कारण केवळ अतिरिक्त जीएसटीचं नव्हे तर इतरही काही चार्जेस यामध्ये लावण्यात आल्यानं दुचाकीसाठीच्या नंबर प्लेटसाठी तब्बल ७०० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. या पुढच्या वाहनांसाठी तर हा खर्च आणखीनच वाढतो आहे.