हॉटेलमधील हुक्का पार्लरला राजकीय नेते मंडळी व हितसंबंधामुळे राजाश्रय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hukka-Parlour

पुणे शहरातील हॉटेलांमध्ये सुरू असलेल्या हुक्का केंद्रांना राजाश्रय आहे. ही हॉटेल राजकीय नेते मंडळींच्या मालकीची, कुठे भागीदारीत, तर कुठे मर्जीतील कार्यकर्त्यांची आहेत. त्यामुळे अशा हुक्का पार्लर सुरू असलेल्या हॉटेलांवर राजकीय दबाव व हितसंबंधामुळे पोलिस कारवाई करीत नाहीत.

हॉटेलमधील हुक्का पार्लरला राजकीय नेते मंडळी व हितसंबंधामुळे राजाश्रय

पुणे - शहरातील हॉटेलांमध्ये सुरू असलेल्या हुक्का केंद्रांना राजाश्रय आहे. ही हॉटेल राजकीय नेते मंडळींच्या मालकीची, कुठे भागीदारीत, तर कुठे मर्जीतील कार्यकर्त्यांची आहेत. त्यामुळे अशा हुक्का पार्लर सुरू असलेल्या हॉटेलांवर राजकीय दबाव व हितसंबंधामुळे पोलिस कारवाई करीत नाहीत. कारवाई झालीच, तर ती नावाला केली जाते. त्यामुळे शहरातील युवकांची व्यसनाधिनता दिवसेंदिवस वाढत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

शहरात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या कंपन्या सुरू झाल्यानंतर खराडी व हिंजवडी आयटी पार्कभोवती हॉटेलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. उपनगरांसह शहराच्या मध्यवस्तीतील काही हॉटेलांमध्ये मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू झाली. या हॉटेलमधील दैनंदिन कामकाज व्यवस्थापकाच्या नावाने चालते. पोलिस या ठिकाणी जाताच बड्या नेते मंडळींची नावे पुढे करून कारवाई टाळली जाते. कारवाई केलीच तर ती हॉटेलचे व्यवस्थापक किंवा कर्मचाऱ्यांवर केली जाते. काही दिवसांनंतर ही हॉटेल्स त्याच नावाने किंवा नाव व जागा बदलून सुरू होतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या हॉटेलची नावेसुद्धा गुन्हेगारी विश्‍वातील प्रचलित भाषेतील असतात. तर कधी थेट गुन्हेगारांचे उदात्तीकरण केलेली, युवकांना आकर्षित  करणारी नावे या हॉटेलांना आहेत. त्यामुळे युवकांची पावले आपोआप तिकडे वळतात. तेथे आलेल्या युवकांना हुक्क्याच्या माध्यमातून व्यसनाच्या जाळ्यात ओढले जाते. हुक्का घेता घेता गांजा, ब्राऊन शुगर आदी अमली पदार्थांचे व्यसन युवकांना कधी लागते, याचा पत्ता लागत नाही. जेव्हा लागतो, तेव्हा उशीर झालेला असतो. त्यानंतर त्यांच्या पालकांची धावाधाव व्यसनमुक्ती केंद्रांकडे होते. अशा व्यसनमुक्ती केंद्रातून परत आलेले खूप कमी युवक पूर्ववत आयुष्य जगतात. कित्येकांचे भविष्य अंधकारमय होते. याची झळ त्यांच्या कुटुंबाला बसते. याची पर्वा ना राजकीय नेतेमंडळींना आहे, ना पोलिसांना.

कोट्यवधीच्या वाळू बोटी उडवल्या; भिगवणला पोलिसांची धडक कारवाई

पोलिस आयुक्तांनी दाखविली यादी
पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता दर बुधवारी सर्व पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत असतात. पंधरवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत शहरातील कोणत्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू आहेत, याची यादीच (गुन्हे शाखेकडील) आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दाखविली. यानंतरही शहरात राजरोसपणे हुक्का पार्लर सुरू असल्याचे दिसून येते. 

बातमी महत्त्वाची : बॅंक अधिकारी-कर्मचारी दोन दिवस जाणार संपावर

विमाननगर, कल्याणीनगर, खराडी परिसरातील हुक्का पार्लरसह अवैध धंदे करणाऱ्यांना ते तत्काळ बंद करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यानंतरही ते सुरू ठेवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. 
- किशोर जाधव, सहायक पोलिस आयुक्त, येरवडा

Edited By - Prashant Patil

loading image
go to top