खुटबाव - भांडगाव (ता. दौंड) येथील ऑलम्पस स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ७२० विद्यार्थ्यांनी एक एकर क्षेत्रामध्ये मानवी भारत देशाची प्रतिकृती साकारत विविधतेमध्ये एकता हा संदेश दिला. यामध्ये प्रत्येक राज्यातील स्वातंत्र्य सैनिक, महान व्यक्तींची पोस्टर हातामध्ये घेत विद्यार्थ्यांनी विविधतेमध्ये एकतेचे दर्शन घडवले.