Haridas Varhad
sakal
पुणे - खडकवासला धरण परिसरात रात्री नऊच्या सुमारास १५ ते १६ वर्षाच्या युवतीला तिचा मित्र एकटीला सोडून निघून गेला. त्यावेळी ती अंधारात एकटीच उभी होती. मात्र, धरणाच्या येथील सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे तिला वेळेवर मदत मिळाली अन पोलिसांच्या माध्यमातून ती युवती सुखरूप घरी पोचली. सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांच्या सतर्कतेमुळे ही तरुणी सुरक्षितपणे घरी पोहोचली.