

Traffic Congestion Turns Fatal in Alandi, Ex-CRPF Soldier Loses Life
sakal
आळंदी : सीमेवर २२ वर्षे छातीचा कोट करून देशाचे रक्षण करणाऱ्या एका जवानाचा अंत आपल्याच व्यवस्थेच्या नाकर्तेपणामुळे व्हावा, यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असू शकते? ज्या हातांनी देशाचा तिरंगा अभिमानाने धरला, त्याच हातांना वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि मुलीला आळंदीच्या रस्त्यावर वाहनांच्या पुढे धावत रस्ता मागण्याची वेळ आली. पण, आळंदीच्या त्या भीषण वाहतूक कोंडीने एका जवानाचा श्वास कायमचा रोखला.