

कोलकता, ता. ७ (पीटीआय) ः पश्चिम बंगालमधील आम जनत उन्नयन पक्षाचे(एजेयूपी) प्रमुख हुमायूँ कबीर यांनी बुधवारी निवृत्तीचे संकेत दिले. रेजीनगर येथे पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानावेळी हुमायूँ आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना हुमायूँ यांना भावना अनावर झाल्या. यापुढे सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत कबीर यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे रेजीनगर या अल्पसंख्याकबहुल भागात भाजपच विजयी होईल,असे भाकीतही त्यांनी वर्तविले. तसेच सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्रिपदावर असेपर्यंत विधानसभेच्या कोणत्याही सत्राला जाणार नसल्याचे सांगत नवदा मतदारसंघातील जनतेची माफी मागितली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. राजकीय व्यवस्थेबद्दल भ्रमनिरास झाल्याचे सांगत कबीर यांनी सक्रिय राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचेही संकेत दिले. ‘‘मला मिळत असलेल्या वागणुकीमुळे मी निराश झालो आहे असेही ते म्हणाले.
रेजीनगरमध्ये मंगळवारी झालेल्या तणावपूर्ण मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी कबीर यांनी ही भूमिका मांडली. पक्ष कार्यालयाबाहेर पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सुमारे १२ तास पोलिसांच्या ताब्यात राहिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
रेजीनगरमध्ये कबीर यांचा मुलगा गोलाम नबी आझाद हा एजेयूपीचा उमेदवार असल्याने या पोटनिवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.