हजारांवर तरुणांना नोकरीची संधी

हजारांवर तरुणांना नोकरीची संधी

पुणे  - विविध शैक्षणिक शाखेच्या तब्बल एक हजार तरुणांना ४० बहुउद्देशीय कंपन्यांमध्ये ‘एपीजी लर्निंग’तर्फे ‘राइज जॉब फेअर फेब्रुवारी २०१९’ च्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना  सरासरी ५ लाख ते साडेआठ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. पुणे स्थानकाजवळील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या माहिती-तंत्रज्ञान महाविद्यालयात (एआयएसएसएमएस) आयोजित केलेल्या या फेअरमध्ये राज्यभरातून ३ हजार ५०० हून अधिक विद्यार्थी मुलाखतीसाठी आले होते. पहिल्यांदाच ‘राइज जॉब फेअर’ला सुरवात केली. यामध्ये ‘राइज’ ही आमची थीम आहे. त्यानुसार पहिल्यांदा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पुढील काळात दर तीन महिन्यांनी वाणिज्य, आर्थिक, सेवा क्षेत्राशी संबंधित एक किंवा दोन उद्योग समूहांवर लक्ष केंद्रित करून नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत.’’ 

भारद्वाज म्हणाल्या, ‘‘विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी निवडण्याची संधी या उपक्रमातून मिळते. कपंन्यांना यातून खरंच ज्यांच्यामध्ये क्षमता आहे असे तरुण मिळतात.’’

डॉ. माने म्हणाले, ‘‘ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील विद्यार्थ्यांना अशा अनेक संधी उपलब्ध होतात. ‘एपीजी लर्निंग’च्या या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल.’’

हा उपक्रम चांगला आहे. एकाच वेळी तरुणांना कंपनी आणि कंपनीला वेगवेगळे तरुण निवडण्याची संधी आहे; अन्यथा नोकरीचा शोध घेत तरुणांना भटकंती करावी लागते.
- भूपेश कुंभार, व्यवस्थापकीय संचालक, झेनकॉन इन्फोटेक

माझ्या माहितीमधील हा अतिशय वेगळा आणि चांगला प्रयत्न आहे. आमच्या कंपनीत २०० जागा भरायच्या आहेत. इथे आलेल्या तरुणांची संख्याही अधिक असल्याने आम्हाला तेवढे कामगार मिळतील.
- जान्मेजॉय महातो, टेक महिंद्रा

वर्तमानपत्रात बातमी वाचून आले होते. एकाच ठिकाणी असल्यामुळे दोन कंपन्यांच्या मुलाखती देता आल्या. एरवी एवढ्या कंपन्यांची माहिती मिळवणे किती अवघड झाले असते. 
- प्रियांका आदक, विद्यार्थिनी

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com