हुरडा पार्ट्या यंदा पडणार लांबणीवर

Hurada-Party
Hurada-Party
Updated on

टाकवे बुद्रुक - नववर्षाची चाहूल... अंगाला बोचणारी पण तरीही हवीहवीशी वाटणारी थंडी...अस्सल मावळी जेवणाचा बेत... तोंडाला चटका बसत खावा वाटणारा ज्वारी-गव्हाचा हुरडा... होय हे सारे वातावरण हुरडा पार्टीचेच आहे. पण या पार्ट्यांची लज्जत पर्यटकांना यंदा नववर्षारंभाला घेता येणार नाही. पावसामुळे रब्बीच्या लागवडी लांबल्याने हुरडा पार्टीचा फड रंगवायला पर्यटकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

यंदा पाऊस लांबल्याने गहू, ज्वारीच्या पेरणी उशिरा झाल्या. रब्बी हंगामात पेरणीसाठी शिवारात वापसा उशिरा झाला. हिवाळ्यामध्ये शिवारात हुरडा पार्ट्या तशी मावळमधील मेजवानीच. पण यंदा हुरड्याच्या हंगामाला उशीर होणार हे निश्‍चित आहे. आंद्रा आणि ठोकळवाडी धरण परिसरात ठिकठिकाणी अनेक फार्म हाउस आहेत. काही ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रदेखील आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या हुरडा पार्टीची मेजवानी काही औरच असते. काही धनिक मंडळी आपले नातेवाईक, सगेसोयरे, पै-पाहुणे, मित्रांना आग्रहाने या पार्ट्यासाठी निमंत्रित करतात. ठोकळवाडी धरण १९६५ नंतर पहिल्यांदा कधी नव्हे इतके भरले आहे. पावसाळ्यात धरणाच्या सांडव्यावरून पाणी गेले.

ऑक्‍टोबर अखेर संपणारा पाऊस लांबला. त्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी तशीच राहिली. जी पूर्वी कमी झाली की मोकळ्या जागेत कुसूर, खांडी, चिरेखान, सावळा, माळेगाव, कुणे, अनसुटे, पारिठेवाडी सह अन्य गावांत गव्हाची पेरणी होत असायची. त्या जमिनीवर सध्या पाणी आहे. 

आंदर मावळात ज्वारी पेरणीचे प्रमाण कमी आहे. भोयरे, कशाळ कोंडिवडेत मोजके शेतकरी हे पिके घेतात. पण यंदा काही ठिकाणी ज्वारी पेरणी केली आहे. तर काही शेतकरी अन्य पिकांकडे वळले आहेत. पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारा निसर्ग हिवाळ्यात विशेषतः नववर्षाच्या पूर्वसंधेला परिसरात अनेक पर्यटक गर्दी करतात. यंदा हुरडा पार्टी नसणार आहे. पण काही कृषी पर्यटकांनी केंद्रात शाकाहारी-मांसाहारी जेवणाचा बेत आखला आहे. कारण ज्याची हुरडा पार्टी केली जाते, तो गहू आता कुठे शिवारात उगवून वाढायला सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com