तेरा दिवसात पती-पत्नीचा स्वाईन फ्लुमळे मृत्यु 

जनार्दन दांडगे
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु झाला. केवळ तेरा दिवसाच्या आत पती-पत्नीचा मृत्यु स्वाईन फ्लुमळे झाल्याने कांचन कुटुबियांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. उरुळी कांचन गावात अवघ्या तेरा दिवसाच्या आत तीन जणांना स्वाईन फ्लुच्या संसर्गामुळे मृत्युला सामोरी जावे लागल्याने उरुळी कांचन व परिसरात खळबळ उडाली

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु झाला. केवळ तेरा दिवसाच्या आत पती-पत्नीचा मृत्यु स्वाईन फ्लुमळे झाल्याने कांचन कुटुबियांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. उरुळी कांचन गावात अवघ्या तेरा दिवसाच्या आत तीन जणांना स्वाईन फ्लुच्या संसर्गामुळे मृत्युला सामोरी जावे लागल्याने उरुळी कांचन व परिसरात खळबळ उडाली. 

तर दुसरीकडे उरुळी कांचन गावठाणातील अस्वच्छता, वातावरणात होणारे अचानक बदल आणि साथीच्या रोगांना अटकाव करण्यास ग्रामपंचायतीसह जिल्हा परीषदेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याने मागील कांही दिवसात डेंगी व अन्य साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. केवळ उरुळी कांचन गावातील खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या साथीच्या रुग्नांची संख्या पाचशेहुन अधिक संख्येवर पोचली आहे.

एकीकडे स्वाईन फ्लुची भिती तर दुसरीकडे डंगीचा धोका अशा दुहेरी पेचात उरुळी कांचनचे ग्रामस्थ अडकले आहेत. साथीचे रोग आटोक्यात आणण्याऐवजी जिल्हा परिषदेचा आरोग्य कागदी घोडी नाचवण्यात मग्न आहे. तर दुसरीकडे उरुळी कांचनच्या सरपंचावर अविश्वाश ठराव मंजुर झाल्याने प्रशासनावर कोणाचा धाक उरलेला नाही. अशा स्थितीत साथीच्या रोगाची स्थिती सुधारण्यासाठी कोणी वालीच उरला नसल्याने, आत्ता देवच तरी यातुन वाचवेल अशी केविलवाणी स्थिती नागरिकांची निर्माण झाली आहे. 

उरुळी कांचन परिसरात स्वाईन फ्लु व डेंगी सदृश साथीच्या तापाच्या रुग्णांची आकडेवारी वेगाने वाढत असल्याच्या वृत्तास उरुळी कांचन परिसरातील अनेक खाजगी रग्णालयांच्या डॉक्टरांनी दुजोरा दिला. उरुळी कांचन गावातील काही कुटुंबे पुर्णतः आजारी आहेत. तर काही डाॅक्टर, लोकप्रतिनीधीही यातून सुटलेले नाहीत. उरुळी कांचन येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने आठवडाभरापुर्वी केलेल्या सर्वेतक्षणात केवळ पन्नासच्या आसपास डेंगी सदृश्य तापाचे रुग्ण आढळल्याची नोंद असली तरी, प्रत्यक्षात स्थिती मात्र अतिशय गंभीर आहे. उरुळी कांचन परीसरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात गेले की, डेंगी किंवा डेंगी सदृश्य रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आढळुन येत आहेत. केवळ उरुळी कांचन परिसरातील खाजगी रुग्णालयाचा विचार केल्यास, डेंगी सदृश्य तापाचे रुग्ण पाचशेहुन अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. अशी स्थिती असतानाही जिल्हा परीषदेचा आरोग्य विभाग मात्र सर्वेक्षणाची कागदी घोडी नाचवण्यात दंग आहे. तर सरपंच कोण होणार व कोण करणार या विवंचणेत ग्रामपंचायतीचे सदस्य मशगुल असल्याने नागरिकांना कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे. 

ग्रामपंचायतीच्यावतीने बोलताना ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनिल कांचन म्हणाले, उरुळी कांचन परिसरात पाचशेहुन अधिक डेंगी सदृश्य तापाचे रुग्ण उपचार घेत आहेत ही बाब खरी आहे. गावाला सध्या सरपंच व उपसरपंच नसल्याने, प्रशासन ढिले पडले आहे. त्याचा परिणाम साथीचे रोग पसरणाऱ्यांवर झालेला आहे. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग केवळ कागदोपत्री सर्वेक्षण करुन, नागरिकांची व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची दिशाभुल करीत आहे. स्वाईऩ फ्लुमुळे् अवघ्या तेरा दिवसात तीन जणांना मृत्युला सामोरी जावे लागले असतानाही, हा रोग इतरांना होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत हे वास्तव आहे. डेंगी व स्वाईन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेनेच पुढाकार घेण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband and wife death in 13 days due to swine flu