पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

पूणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोंढे वस्ती गागरगाव (ता. इंदापूर) येथे दुचाकीस पाठीमागून वेगाने आलेल्या चारचाकीने धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.

इंदापूर : पूणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोंढे वस्ती गागरगाव (ता. इंदापूर) येथे दुचाकीस पाठीमागून वेगाने आलेल्या चारचाकीने धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात सुवर्णा दुपारगुडे, दयानंद दुपारगुडे या पती-पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार (ता. 17 रोजी) सकाळी साडेअकरा वाजता घडला.

फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या'; पुण्यातील आयटी कंपनीचा प्रताप!

दरम्यान, मृत हे दुचाकीवरून निलेगाव ( ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) या आपल्या मूळगावी निघाले होते. यासंदर्भात वैभव दुपारगुडे ( सध्या रा. सिंहगड रोड, धायरी गारमाळ, पुणे, मूळ गाव निलेगाव) यांच्या फिर्यादीवरून चारचाकी वाहन चालकाविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू 

फिर्यादी व त्यांचे चुलते व चुलती, नात हे दुचाकीवर (क्रमांक एम एच 12 केएफ 5535) पुण्यावरून सकाळी सात वाजता आपल्या मूळगावी निलेगाव येथे निघाले होते. ते महामार्गावर लोंढेवस्ती गागरगाव ( ता. इंदापूर ) येथे रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी थांबले असताना, त्याचवेळी पुणे बाजुकडून भरधाव आलेल्या चारचाकीने (क्रमांक एम एच 04 एचएम1528 ) त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये सुवर्णा दुपारगुडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती दयानंद दुपारगुडे यांना दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला.

- 'फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या'; पुण्यातील आयटी कंपनीचा प्रताप!

तसेच यामध्ये त्यांची नात वेदिका मनोज दुपारगूडे ही जखमी झाली आहे. चारचाकीचा वेग जास्त असल्याने चारचाकीने त्यांना फरफटत नेले. ही कार देखील सोलापूर दिशेने जात होती. इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband and wife die in accident on Pune-Solapur highway