esakal | पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

कोरोनामुळे आता रूग्णवाहिका पाठविता येणार नाही, अशीच उत्तरे त्यांना मिळाली.

पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, आयटी हब, अशी बिरूदं मिरवणाऱ्या पुणे शहरावर शुक्रवारी (ता.१५) नामुष्की ओढवलीय. कोरोना व्हायरस आणि त्यानंतरच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत केवळ रुग्णवाहिका आली नाही म्हणून, एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रशचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्यवस्तीतील घटना
तब्बल अडीच तास आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांशी संपर्क साधूनही रूग्णवाहिका न मिळाल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुण्यात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास नाना पेठेतल्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. यशूदास मोती फ्रान्सिस (वय 54, रा. नानापेठ) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्चला मिळाला होता. पण, त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत गेली. आजपर्यंत मुंबईनंतर राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पुण्यात आहेत.

- आषाढी वारीबाबत संधिग्दता कायम; निर्णयासाठी आता पुढची तारीख

पुणे राज्यातील रेड झोन असलेल्या शहरांपैकी एक असल्यामुळं शहरातील हॉटस्पॉट सील करण्यात आले आहेत. मध्य वस्तीतील नाना पेठेतही रस्ते सील करण्यात आले आहेत. त्याच परिसरात ही अतिशय नामुष्कीजनक घटना घडली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शुक्रवारी संध्याकाळनंतर व्हायरल झाला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

- मनाला चटका लावणारी बातमी : गड्या एक दिवस थांबायच होतंस!

मदतीला कोणीच आले नाही!
दरम्यान, शेजारी पोलिस चौकी असूनही पोलिस आणि स्थानिक नागरिक फ्रान्सिस कुटुंबीयांच्या मदतीसाठी आले नाहीत.
रात्री एकच्या सुमारास फ्रान्सिस यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना रूग्णालयात नेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर दीडच्या सुमारास डुल्या मारूती चौकात कुटुंबीयांनी वाहनाची शोधाशोध केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर 100 व 108 या क्रमांकांवर संपर्क साधून रूग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, कोरोनामुळे आता रूग्णवाहिका पाठविता येणार नाही, अशीच उत्तरे त्यांना मिळाली. त्यानंतर जवळपास दोन ते सव्वादोन तास फ्रान्सिस हे अत्यावस्थेत रस्त्यावरच पडून होते. त्यानंतर शेजारची खुर्ची आणून त्यांना त्यावर बसविले. साडेतीन तास झाले तरी रूग्णवाहिका न आल्याने अखेर त्याच खुर्चीवर फ्रान्सिस यांनी प्राण सोडला.

- हृदय पिळवटून टाकणारी कहाणी : '...ते माहीत नाही, पण आमचे मात्र कुटुंब उद्‌ध्वस्त झाले'

दरम्यान, पावणेचारच्या सुमारास भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून फ्रान्सिस यांना ससून रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले.

loading image
go to top