नवऱ्याने पाडले बायकोचे तीन दात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पिंपरी - पतीने लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून महिलेचे तीन दात पाडले. ही घटना चिखली येथे घडली.

विजय भीमराव बनकर (वय ४५, रा. चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००५ मध्ये फिर्यादी महिला आणि बनकर यांचा विवाह झाला आहे. तेव्हापासून त्यांच्यात किरकोळ कारणाहून वाद सुरू आहेत. ता. ३१ जुलै रोजी सकाळी फिर्यादी महिला या मुलांच्या डब्यासाठी भाजी बनविताना बनकर आणि त्यांच्यात पुन्हा किरकोळ कारणाहून वाद झाला. या वेळी बनकर याने पत्नीला लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यामध्ये त्यात त्यांचे समोरील तीन दात पडले.

Web Title: Husband Beating to Wife Crime