पत्नीच्या औषधोपचाराच्या खर्चाच्या तणावाने पतीची आत्महत्या

पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याच्या तणावातून पतीने गळफास लावून केली आत्महत्या.
Suicide
SuicideSuicide

बारामती - पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याच्या तणावातून आज बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथील मनोहर संभाजी कुतवळ (वय 35) यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

पुण्यातील एका प्रथितयश रुग्णालयामध्ये पत्नीवर औषधोपचार सुरु होते, रुग्णालयाकडून पैसे भरण्यास सांगितले जात होते व पैशांची जुळवाजुळव होत नव्हती, त्याचा तणाव मनोहर यांच्यावर होता. त्यांनी जवळपास साडेचार लाख रुपये जमा करुन रुग्णालयात भरले होते, मात्र अजून रक्कम भरण्याचा निरोप आल्यानंतर आज पहाटे एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

मनोहर यांचे चुलते दत्तात्रय कुतवळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्याशी संपर्कात होते. संबंधित रुग्णालयाला बिल कमी करण्याबाबतची प्रक्रीया सुरु असतानाच मनोहर यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्येचे पाऊल उचलले.

Suicide
चेन्नई-अहमदाबाद सुपरफास्ट एक्स्प्रेसचा मार्ग मेगाब्लॉकमुळे बदलला; प्रवाशांची गैरसोय

यानंतर सुनीलकुमार मुसळे यांनी ही परिस्थिती सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनाही या घटनेचा धक्का बसला. त्यांनी तातडीने संबंधित रुग्णालय गाठले आणि तातडीने संबंधित महिलेच्या उपचाराचे संपूर्ण बिल माफ करण्याचे निर्देश दिले. स्वताः सह धर्मादाय आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून थेट दवाखान्यात येत यंत्रणेला सूचना देण्याची घटना काहीशी महत्वपूर्ण म्हणावी लागेल.

टोकाचा निर्णय घेण्याअगोदर संपर्क साधा...

दवाखान्याच्या बिलांसंदर्भात कोणीही टोकाचा निर्णय घेऊ नये. काहीही अडचण असल्यास धर्मादाय आयुक्तांसोबत चर्चा करावी. पुणे, सातारा, सोलापूर, नगर या चार जिल्ह्यातील 150 पेक्षा जास्त दवाखाने धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत आहेत, या मध्ये काहीतरी मार्ग काढता येतो, पण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय कोणीही घेऊ नये.

- सुधीरकुमार बुक्के, सह धर्मादाय आयुक्त, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com