पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षेच्या पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

जयवंत लालसिंग रजपूत असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रजपूत हे स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा निता रजपूत यांचे पती आहेत. जयवंत रजपूत यांनी त्याच्या विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षेच्या पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजु शकले नाही, याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जयंत लालसिंग रजपूत (वय 54, रा.1707, पिनैकल अपार्टमेंट, सदाशिव पेठ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रजपूत हे स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा निता रजपूत यांचे पती आहेत. परदेशी यांचे विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील कांचन गल्लीतील चैतन्य अपार्टमेंटच्या 8 क्रमांकाच्या सदनिकेत कार्यालय आहे. बुधवारी रजपूत हे कामानिमित्त त्यांच्या कार्यालयात थांबले होते. 

गौतम पाषाणकर प्रकरणाला वेगळे वळण; बेपत्ता होण्यामागे बड्या राजकीय व्यक्तीचा हात?

दरम्यान, त्यांनी कार्यालयातच गळफास घेतला. हा प्रकार तेथे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला. त्याने याविषयी तत्काळ त्यांच्या कुटुंबीयांना व पोलिसांना खबर दिली. त्यांना तत्काळ रुग्णलयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कोरोना काळात १० लाख कुटुंबांना केली मदत - राष्ट्रीय स्वंयसेवक संघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband of former chairman of Pune Municipal Corporation standing committee commits suicide

Tags
टॉपिकस
Topic Tags: