प्रेमविवाह करून पत्नीला भाड्याच्या घरात सोडून पती बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे वेगेवगळ्या प्रकारचे नुकसान झाले आहे. प्रेमविवाह झालेल्या युवकाने पत्नीला भाड्याच्या घरात एकटीला सोडून पती पलायन केले आहे. घरभाडे भरण्यासाठीदेखील तिच्याकडे पैसे नाहीत. अशातच बेपत्ता झालेला पती आज नाही उद्या भेटेल या आशेने विमानतळ पोलिसांकडे, तसेच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पत्नी तिचा शोध घेत आहे.

विश्रांतवाडी - लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे वेगेवगळ्या प्रकारचे नुकसान झाले आहे. प्रेमविवाह झालेल्या युवकाने पत्नीला भाड्याच्या घरात एकटीला सोडून पती पलायन केले आहे. घरभाडे भरण्यासाठीदेखील तिच्याकडे पैसे नाहीत. अशातच बेपत्ता झालेला पती आज नाही उद्या भेटेल या आशेने विमानतळ पोलिसांकडे, तसेच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पत्नी तिचा शोध घेत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरिता राकेश दिवटे (वय-30, रा.माळवाडी वस्ती, लोहगाव) यांनी आपला पती राकेश पुनाजी दिवटे हा (दि.26 जून) पासून घरातून निघून गेल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात दिली आहे. सरिता व राकेश यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला असून त्यांच्या प्रेमविवाहाला दिवटे कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे सरिता व राकेश लोहगाव येथे भाड्याच्या घरात राहत होते. ते दीड वर्षे एकत्र राहिले. कोरोनाच्या संकटामुळे राकेश याचे काम कमी झाले. त्यामुळे त्याला आर्थिक टंचाई आली होती. त्यातच राकेशचे नातेवाईक सरिताला सोडून घरी परत ये असे वारंवार फोन करून सांगत होते. दि.26 जूनला सरिताला भाड्याच्या घरात एकटीलाच सोडून राकेश बेपत्ता झाला आहे.

मेगा भरती! पुणे जिल्हा परिषद दीड हजार रिक्त पदे भरणार!

याबाबत सरीताने आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात दिली आहे. दि. 26 जूनला बेपत्ता झाल्यावर त्याबाबतची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात देऊनदेखील पोलीस काहीच तपास करत नाहीत. याउलट स्वतःचा मुलगा बेपत्ता होऊनदेखील दिवटे कुटुंबीय शोध घेत नसल्याने सरिताला त्यांच्यावर शंका येत आहे.

बेरोजगार आहात? काळजी करू नका; ट्रेनिंगदरम्यान मिळणार दरमहा १० हजार अन् त्यानंतर नोकरीही!

त्यांनीच आपल्या पतीला गायब केल्याचा संशय आहे. एकटी पडलेली सरिता आपल्या पतीचा शोध घेत आहे. लॉकडाऊनपासून घरची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे त्यामध्ये पतीने अचानक साथ सोडल्याने तिच्याकडे घरभाडे देण्यासाठी पैसेदेखील नाहीत. पती आज नाही तर उद्या परत येईल अशी आशा ती बाळगून आहे. त्यासाठी ती अनेकांकडे पतीला शोधून काढण्यासाठी मदत मागत आहे. पोलिसांनी निःपक्षपातीपणे तपास करून माझ्या पतीला शोधून काढावे अशी तिची केविलवाणी मागणी आहे.

याबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गंधाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राकेशचे मोबाईलचे कॉल तपासले जात आहेत. त्याच्या नातेवाईकांची चौकशी करून तपास केला जाईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband goes missing after leaving his wife in a rented house