शिवसृष्टीच्या दृष्टीने अमित शहांची भेट महत्वाची : बाबासाहेब पुरंदरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मला भेटायला आलेत याचा आनंद मला आहे. शहा यांची भेट ही शिवसृष्टीच्या दृष्टीने महत्वाची असून महाराजांचे जीवनकार्य हे लोकांसमोर आणता येईल, अशी प्रतिक्रिया शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिली.

पुणे शहरात विविध कार्यक्रमासाठी अमित शहा हे आले होते. दिवसभरात त्यांनी भाजपच्या सोशल सेलला मार्गदर्शन केल्यानतंर त्यांनी तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकाचे दर्शनही घेतले. त्यानतंर त्यांनी चाणक्य यांच्यावर आधारित व्याख्यान दिल्यानतंर बाबासाहेेब पुरंदरे यांची भेट घेतली आणि मोदी सरकारने आत्तापर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा त्याच्यासमोर मांडला. याबद्दल पुरंदरे यांनी समाधान व्यक्त केले असून, शिवसृष्टी पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह स्थानिक आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

Web Title: I am so glad to meet Amit Shah says Babasaheb Purandare