विकृत माणसांच्या कुंडल्या माझ्याकडे : अप्पर पोलीस अधिक्षक संदीप जाधव

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मंचर : “पुणे जिल्ह्यात मी नवीन असलो तरी राज्य पोलीस गुप्तचर विभागात काम केले आहे. त्यामुळे अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. समाजात दुही माजविण्याचे काम काही विकृत माणसे करतात. त्यांच्यावर करडी नजर पोलीस ठेवणार आहेत. त्यांच्यावर कारवाही करताना कोणीही हस्तक्षेप न करता समाजाने पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभे रहावे.’’ असे आहावन पुणे जिल्ह्याचे उप्पर पोलीस अधिक्षक संदीप जाधव यांनी केले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे शनिवार (ता. 18) ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठेकीत संदीप जाधव बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, प्रवीण मोरडे, युवराज बाणखेले, मंगेश बाणखेले, मुनीर शेख, अल्लू इनामदार, हाजी मन्सूरखान पठाण, अरुणनाना बाणखेले, आशिष पुगलिया, शेवाळवाडीच्या सरपंच सुमन थोरात, कैलास बाणखेले व पोलीस पाटील उपस्थित होते. 

संदीप जाधव म्हणाले,’’सोशल मिडियावरून येणारी माहिती खातरजमा न करता फोरवर्ड केली जाते. त्यामुळे अनेकदा अनुचित प्रकार घडतात हे प्रकार टाळले पाहिजे. मंचरमध्ये वाढदिवस, रात्री व दिवसा मोटारसायकलवरून शहर व महाविद्यालय परिसरात  शायनिंग करत फिर्नार्यांचा बंदोबस्त पोलीस करतील. वाहतूक समस्येबाबत उपाय योजना केल्या जातील.’’

टोम्पे म्हणाले “मराठा आरक्षणासाठी मंचरला काढलेला मोर्चा शिस्तीत व शांतेत पार पडला. येथील हिंदू व मुस्लीम ऐक्य कौतुकास्पद आहे. त्यामुळे बकरी ईद, गणेश उत्सव व मोहरम हे सण उत्सहात व शांततेत पार पडतील असा विश्वास आहे. पोलीस व जनता यांच्यातील समन्वय वाढविण्यावर भर देवू.’’

यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, भाजपचे संपर्क प्रमुख जयसिंग एरंडे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, सरपंच दत्ता गांजाळे, मुस्लीम समाजाचे नेते राजू इनामदार, सामाजिक कार्यकर्ते संतोष बाणखेले यांची मनोगते झाली. सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांनी केले.

Web Title: i have a all information about Distorted persons said sandip jadhav