मुंबईमधून कोल्हापूरला आल्यानंतर तेथेही मला विरोध झाला, पण...- चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

मुंबईमधून कोल्हापूरला आल्यानंतर सुरूवातीला तेथेही मला विरोध झाला, पण मी थंड डोक्‍याने माझे काम करत राहिलो. आता मी कोल्हापूरमधील दहाही मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली तर तेथून जिंकून आलो असतो अशी स्थिती आहे. तेथे काम करत राहिल्याने कोल्हापूरकरांनी जसे मला स्विकारले तशीच स्थिती पुण्यामध्ये निर्माण होईल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.

पुणे : मुंबईमधून कोल्हापूरला आल्यानंतर सुरूवातीला तेथेही मला विरोध झाला, पण मी थंड डोक्‍याने माझे काम करत राहिलो. आता मी कोल्हापूरमधील दहाही मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली तर तेथून जिंकून आलो असतो अशी स्थिती आहे. तेथे काम करत राहिल्याने कोल्हापूरकरांनी जसे मला स्विकारले तशीच स्थिती पुण्यामध्ये निर्माण होईल, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.

मेगाभरतीमध्ये आलेल्यांकडून पक्षशिस्तीचे पालन होत आहे का असे विचारले असता पाटील म्हणाले, अन्य पक्षातून जे भाजपमध्ये आले आहेत, ते शिस्तीत वागत आहेत. नारायण राणे यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भर सभेमध्ये राणे यांना तुम्ही आता आमच्या शाळेत आला आहात आमचे नियम समजून घ्या असे सांगितले. भाजपमध्ये यापूर्वी अनेक जण आले, त्यांनी पक्षाची शिस्त स्विकारली. जे स्विकारू शकत नाहीत ते बाहेर पडतील.

शिवसेच्या मुखपत्रातून टीका होत असली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ज्यावेळेला बोलून टीका करतील तेव्हा आमच्यासाठी अडचणीचे ठरेल. एखादी गोष्ट पटली नाही तर ते टीका करू शकतात, थोडेफार मतभेद असतात. जसे घरात पती-पत्नी भांडतात आणि नंतर एकत्र चहा पितात तसे आमचे आहे असे पाटील यांनी सांगितले. मात्र, दोघांमध्ये पती कोण आणि पत्नी कोण हे सांगण्याचे त्यांनी टाळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i was alos opposed in kolhapur says Chandrakant Patil