पुण्यातील 72 टक्के मतदारांची पसंती मलाच: संजय काकडे (व्हिडिओ)

पुण्यातील 72 टक्के मतदारांची पसंती मलाच: संजय काकडे (व्हिडिओ)

पुणे : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील जागा लढवणार असल्याचा दावा केला. 'पुण्यात लोकसभेसाठी मीच सक्षम पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पुण्यातील 72 टक्के मतदारांची मलाच पसंती असल्याचे सांगत संजय काकड़े यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे लोकसभा मतदार संघातील जागा भाजपकडून लढवणार असल्याचा दावा केला.

आज पुण्यात वाडेश्वर हॉटेलकट्यावर पुण्यातला लोकसभेचा उमेदवार कोण यावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संजय काकडे, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, मनसेनेते बाबू वागसकर, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे आदी मंडळी जमली होती. यावेळी लोकसभेचा उमेदवार कोण? अशी चर्चा सर्वांमध्ये रंगली होती. यावेळी पुण्याचा भावी खासदार कोण, या प्रश्नावर संजय काकडे म्हणाले, मी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पुण्याची जागा लढवणार आहे. मला पुण्यातील मतदारांची असलेली पसंती पाहती पक्ष मला संधी देईल आणि मी आतापर्यंत दीड लाख सभासद केले आहे. मी आता जनतेमधून संसदेत जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच नीलम गोऱ्हे मी शिवसेनेची प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे, तर उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले तर मनसे नेते बाबू वागसकर पुण्यात आम्ही देखील रेसमध्ये असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, कालच्या (ता.18) पुण्यातील मेट्रो ३ मार्गिकेच्या भूमिपूजन सोहळ्यात काकडे अनुपस्थित होते. मुंबईत देखील भाजपने सहयोगी पक्षांना निमंत्रण दिले नव्हते आणि पुण्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं नाही म्हणून गेलो नाही, असे काकडे यांनी सांगितले. तसेच, काकडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. राम मंदिराचं राजकारण सोडून आता भाजपाने विकासाकडे वळलं पाहिजे असा घरचा आहेर त्यांनी दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com