बारावीत पुण्यातील विश्रुती देशात तिसरी  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) ९८.५४, तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) ९८.५४, तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजारिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या दोघांनी ९९.६० टक्के गुण मिळवत देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. देशपातळीवरील पहिल्या तीन क्रमांकाच्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातील १६ जण आहेत.

सीआयएससीईमार्फत घेतलेल्या बारावीच्या (आयएससी) परीक्षेत देवांग कुमार अग्रवाल  (कोलकता) आणि विभा स्वामिनाथन (बंगळूर) या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत देशात पहिला क्रमांक मिळविला  आहे. 

या परीक्षेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या गुणवत्ता यादीत राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात पुण्यातील सेंट मेरीज स्कूलमधील विश्रुती रंजन या विद्यार्थिनीने ९९.५० टक्के गुण मिळवत देशपातळीवर तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे. या दोन्ही परीक्षेत विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

* दहावीची (आयसीएसई) परीक्षा : 
- एकूण परीक्षार्थींची संख्या : एक लाख ९६ हजार २७१ 
- विद्यार्थिनींची कामगिरी उल्लेखनीय; ९९.०५ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण
- ही परीक्षा ६० विषयांमध्ये झाली. यात २२ भारतीय भाषा, १० परदेशी भाषा आणि दोन क्‍लासिकल भाषांचा समावेश.
- महाराष्ट्रातून २१ हजार ३८ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा (विद्यार्थी : ११ हजार ५७०/ विद्यार्थिनी : ९ हजार ४६८)

* बारावीची (आयएससी) परीक्षा :
- एकूण परीक्षार्थींची संख्या : ८६ हजार ७१३
- उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी : ९७.८४
- ही परीक्षा ४९ विषयांमध्ये झाली. यात १४ भारतीय, सहा परदेशी आणि एक क्‍लासिकल भाषेचा समावेश.
- महाराष्ट्रातून दोन हजार ७३७ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. (विद्यार्थी : एक हजार ३०८/ विद्यार्थिनी : एक हजार ४२९) 

* पुण्यातील काही शाळांचे निकाल :
- शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव : परीक्षेचे नाव : अनुक्रमे पहिले तीन आलेल्या विद्यार्थ्यांची नावे टक्केवारीसह -
- सेंट मेरीज स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज : आयएससी : विज्ञान शाखा - विश्रुती रंजन (९९.५० टक्के), अमेय पाटील (९८.५०टक्के), देविका खंडेलवाल (९८.५०टक्के). वाणिज्य शाखा- अमिषा लुंकड (९८ टक्के), ऐश्‍वर्या महिंद्रकर (९७.३०टक्के), माहिरा जैन (९६.८०टक्के).

- हचिंग्ज हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज : 
आयसीएसई : सिमरन बडगुजर (९८.२०टक्के), वरद देशपांडे (९७.८० टक्के), सुभ्रोज्योती मुखर्जी (९७.६०टक्के).
आयएससी : आकाश टॉम (९०.५० टक्के), हृतिका शेठ (९२ टक्के).
- विजडम वर्ल्ड स्कूल : आयसीएसई : नमन अगरवाल (९८ टक्के), केविन टॉम आणि अनुष्का श्रीवास्तव (९७.६० टक्के), भाविन मुद्रा (९७.४० टक्के).
- विबग्योर शाळा (एनआयबीएम) : (आयसीएसई)- अनन्या कट्याल (९८.४० टक्के), शौर्य रोहित (९७ टक्के).
- विबग्योर शाळा (बालेवाडी) : (आयसीएसई) - सेजल देऊळकर (९७.६० टक्के), प्रीत त्रिवेदी आणि अनय पाटील (९७.१० टक्के).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICSE ISC Results Declared