Paresh Rawal : ‘मराठीत असतो, तर अधिक समृद्ध झालो असतो’ - परेश रावल

प्रसिद्ध अभिनेते परेश रावल; ‘श्रीराम लागू रंग-अवकाश’च्या कामास प्रारंभ
If I were Marathi actor I would have become more prosperous nsd paresh rawal statement
If I were Marathi actor I would have become more prosperous nsd paresh rawal statement esakal

पुणे : ‘‘मी मराठीतील अभिनेता असतो, तर अधिक समृद्ध झालो असतो. कारण मराठी भाषेतील साहित्य, कलाकार, लेखक हे सारे अव्वल दर्जाचे आहे. या सर्वांशी विचारांचे आदानप्रदान झाले असते, तर त्यातून माझ्या क्षमता निश्चितच अधिक रुंदावल्या असत्या’’, असे मत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (एनएसडी) अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केले.

‘मराठीतील अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग आम्ही गुजराती रंगभूमीवर केले आहेत. त्यामुळे मराठीत उत्तमोत्तम संहिता याव्यात, म्हणजे आम्हालाही त्याचे प्रयोग करता येतील’, असेही त्यांनी मिश्कीलपणे नमूद केले.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या इमारतीत तयार करण्यात येत असलेल्या ‘श्रीराम लागू रंग-अवकाश’ या नाट्यगृहाचा कार्यारंभ सोमवारी (ता. ११) रावल यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी दीपा लागू, सेंटरचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, कार्याध्यक्ष एस. पी. कुलकर्णी, मानद सचिव शुभांगी दामले, सचिव राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

If I were Marathi actor I would have become more prosperous nsd paresh rawal statement
Pune News : शेवटच्या श्रावणी सोमवारी पवित्र शिवलिंगावर जल्लाभिषेक करत महापुजा करुण आरती

रावल म्हणाले, ‘‘महाराष्ट्र कल्चरल सेंटरशी माझे जुने नाते आहे. त्यांचे ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक मी गुजराती भाषेत केले होते. सेंटरतर्फे निर्माण होत असलेल्या या ‘ब्लॅक बॉक्स थिएटर’ची संकल्पना भारतात नवीन आहे. मात्र यांसारख्या सांस्कृतिक जागा ही समाजाची गरज आहे. अशा ‘स्पेसेस’मधून कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांना नव्या रंगशक्यता सापडतील.’’

डॉ. आगाशे म्हणाले, ‘‘रंगकर्मींना फक्त ‘स्पेस’ हवी असते. रंगकर्मी त्या स्पेसमध्ये आल्यावर त्याचे ‘थिएटर’ होते. शहरात सादरीकरणाच्या विविध जागा वाढत असल्या तरी त्यासोबतच नवी आव्हाने उभी राहत आहे. त्यावर मात करून नाटक टिकवायचे आहे.’’ यावेळी अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्रातील काही भागाचे अभिवाचन केले.

...आणि असा झाला ‘जीएसटी’ माफ!

‘‘नाटकांच्या तिकिटांवरचा जीएसटी माफ करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. एकदा अजित भुरे, अशोक हांडे यांच्यासह मी शरद पवार यांना ही समस्या सांगितली. ते आमच्यासह अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आले, भेटीच्या पहिल्या वीस सेंकदातच पवार यांनी जीएसटीचा मुद्दा सांगितला आणि जेटली यांनी तत्काळ ‘जीएसटी’ माफ केला.

‘ही तुमची व्होटबँक नसताना तुम्ही असा पुढाकार का घेतला’, असा प्रश्न मी पवार यांनी विचारल्यावर ‘हा कला आणि संस्कृतीचा विषय आहे’, असे उत्तर पवार यांनी दिले. आजही मुंबईतील कला-संस्कृती मराठी माणसांमुळे टिकली आहे’’, असे परेश रावल यांनी सांगितले.

रंगकर्मींना सर्व शक्यता खुले करणारे ‘रंग-अवकाश’

‘श्रीराम लागू रंग-अवकाश’ ही जागा ‘ब्लॅक बॉक्स थिएटर’ या संकल्पनेवर आधारित आहे. सादरीकरणाच्या रूढ मर्यादा मोडून रंगकर्मींना मनाजोगते नाटक उभे करण्यासाठी नव्या शक्यता खुल्या करणारे हे नाट्यगृह असेल, असे या जागेचे वास्तुरचनाकार माधव हुंडेकर यांनी सांगितले.

‘प्रोसिनियम’ या सादरीकरणाच्या पारंपरिक पद्धतीसह चार विविध पद्धतीने येथे नाटक सादर करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रकाशयोजनेची यंत्रणा, ध्वनीयंत्रणा, नेपथ्य यंत्रणा येथे सज्ज केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com