#MonsoonTourism भोरगड - शिडी लावल्यास वाट सुकर

एकनाथ सांडभोर, भोरगिरी
बुधवार, 20 जून 2018

खेड तालुक्‍यातील भोरगिरी हे ठिकाण नवीन पर्यटनस्थळ म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. गेल्या वर्षी पावसाळी हंगामात येथे दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. निसर्गरम्य परिसर, भीमा नदी व नाल्यांचे खळखळणारा प्रवाह, अनेक धबधबे, भोरगड किल्ला, भीमाशंकर मंदिर हे येथील प्रमुख आकर्षण आहे. इतरत्र कुठेही पाऊस नसला, तरी भोरगिरीत पाऊस असतोच हे इथले वैशिष्ट्य आहे. 

भोरगड व पायथ्याशी असलेल्या नाल्याच्या धबधब्याच्या पाण्याचा पर्यटक आनंद घेतात. येथील खोल नाला आणि प्रवाह मोठा असल्याने पोहता न येणाऱ्या पर्यटकांसाठी धोकादायक आहे. वन खात्याच्या हलगर्जीपणामुळे येथे हे काम होऊ शकत नाही. पावसात शेवाळलेल्या खडकावरून पर्यटक पडण्याचा सतत येथे धोका आहे.

भोरगडाच्या मागच्या बाजूला पाचशे मीटरवर उंच मोठा धबधबा आहे. या धबधब्याखाली भिजण्यास पर्यटक जातात. दोन टप्प्यांतून धबधबा पडतो. वरच्या टप्प्याकडे जाताना नीट रस्ता नाही. झुडपांचा, खडकाचा आधार घेत पर्यटक वर जातात. त्यामुळे घसरून पन्नास फूट खाली पडण्याचा धोका आहे. धबधब्याकडे जाणारी पायवाटही निसरडी आहे. 

मोबाईल मनोऱ्याची गरज
भोरगडावर लेण्याकडे जाताना पायऱ्या व रेलिंगची गरज आहे. पावसाळ्यात येथे स्थानिक सुरक्षारक्षकांची गरज आहे. भोरगडामागील धबधब्याकडे जाण्यासाठी लोखंडी शिड्यांची गरज आहे. येथील वाटेला काही ठिकाणी रेलिंगची गरज आहे. भोरगिरी मार्ग अनेक पर्यटक चालत भीमाशंकरला जातात. मात्र, रस्ता माहीत नसल्याने अनेकदा जंगलात चुकतात. या पर्यटकांना रस्त्यात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे अत्यंत गरजेचे आहे. महत्त्वाची ठिकाणे व त्यांचे अंतर यांचाही मोठा फलक गावात लावल्यास पर्यटकांना ते मार्गदर्शक ठरू शकेल. भोरगिरीत मोबाईल रेंज नाही. पावसाळ्यात पर्यटकांची काही दुर्घटना घडल्यास न जंगल भटकंती करणारे पर्यटक वाट चुकल्यास त्यांच्या संपर्कासाठी त्यांना तातडीच्या मदतीसाठी मोबाईल मनोऱ्याची गरज आहे.

Web Title: if ladder was planted on bhorgad then way will be easier