Lok Sabha Election 2024 : गरज पडली तर बारामतीत दररोज येऊन बसेन- चंद्रकांत पाटील

लोकसभेच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आम्ही ठरविले आहे. यासाठी गरज पडली तर रोज बारामतीला येऊन बूथस्तरावर स्वताः बसून काम करीन, अशी तयारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत बोलताना दाखविली.
If necessary I will come and sit in Baramati every day Chandrakant Patil lok sabha polls politics
If necessary I will come and sit in Baramati every day Chandrakant Patil lok sabha polls politicsSakal

बारामती : लोकसभेच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आम्ही ठरविले आहे. यासाठी गरज पडली तर रोज बारामतीला येऊन बूथस्तरावर स्वताः बसून काम करीन,अशी तयारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत बोलताना दाखविली.

बारामतीत रविवारी (ता. 17) महायुतीची समन्वय बैठक चंद्रकांत पाटील यांनी घेतली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तिन्ही घटक पक्षांनी एक दिलाने व सांघिकपणे काम करा असे आवाहन केले.

राहुल कुल, वासुदेव काळे, संदीप खर्डेकर, प्रदीप गारटकर, रुपाली चाकणकर, सुरेश घुले, बाळासाहेब गावडे, नवनाथ पडळकर, जालिंदर कामठे, पृथ्वीराज जाचक, वैशाली नागवडे, सुरेंद्र जेवरे, पांडुरंग कचरे, बाबाराजे जाधवराव, दिगंबर दुर्गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ज्या कार्यकर्त्यांना विरोधकांचे काम करायचे आहे, त्यांनी पक्ष सोडून मगच ते काम करा, त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नाही, असा खणखणीत इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. रात्रीच्या अंधारात विरोधकांचे काम करायचे व दिवसा आमच्याबरोबर राहायचे, आमचे सरकार आल्यानंतर योजनांचा फायदा घेण्यासाठी आमच्याकडे यायचे असले अजिबात चालणार नाही, बांधिलकी आणि सांघिक भावना महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक बुथवर किमान 370 मते महायुतीच्या उमेदवाराला मिळाली पाहिजेत, हा जो संदेश दिला आहे, त्यानुसार आज पासूनच बूथनिहाय आपल्या उमेदवाराला अधिकाधिक मते कशी मिळतील, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

जेष्ठ नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना शब्द देऊन ऐन वेळेस माघार घेतली व नरेंद्र मोदी यांचा अपमान केला. त्या अपमानाचा आणि फसवणुकीचा बदला घेण्याची संधी आली आहे, त्यामुळे सर्वांनीच घड्याळ या चित्रासमोरील बटन दाबून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी बारामतीत महायुतीच्या उमेदवारावार निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली.

दरम्यान प्रत्येक बुथवर 370 मते कशी मिळवायची याची आकडेवारी देखील त्यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना विशद केली. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे 370 तर एनडीएचे 400 अधिक खासदार निवडून येण्याच्या दृष्टीने देशभरात सांघिक प्रयत्न सुरू आहेत, बारामतीतही महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रित प्रयत्न करण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली.दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवधी असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय समन्वयाची बैठक देखील घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com