शारीरिक बल तर घटले आता मनोबलासाठी प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

कोरोना बाधितांची वाढती आकडेवारी, विलगीकरणापासून ते उपचारापर्यंतचे व्यवस्थापन, परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी राज्यकर्त्यांचा वाढता दबाव, सामान्यांना जीवनावश्‍यकवस्तूंचा पुरवठा, शेल्टर होममध्ये ठेवलेल्यांचे दररोजच्या जेवण्याचे नियोजन.. या व अशा अनेक कामांचे दररोजचे नियोजन एकीकडे तर कुटुंबिक जबाबदारी दुसरीकडे. अशा मानसिक ताणतणाच्या परिस्थितीत महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी दोन महिन्यांपासून काम करीत आहेत.

पुणे - कोरोना बाधितांची वाढती आकडेवारी, विलगीकरणापासून ते उपचारापर्यंतचे व्यवस्थापन, परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी राज्यकर्त्यांचा वाढता दबाव, सामान्यांना जीवनावश्‍यकवस्तूंचा पुरवठा, शेल्टर होममध्ये ठेवलेल्यांचे दररोजच्या जेवण्याचे नियोजन.. या व अशा अनेक कामांचे दररोजचे नियोजन एकीकडे तर कुटुंबिक जबाबदारी दुसरीकडे. अशा मानसिक ताणतणाच्या परिस्थितीत महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी दोन महिन्यांपासून काम करीत आहेत. अशा या कोविड युूद्धांवरील वाढता ताण आता मनःशांती शिबिराच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासाठी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना टप्याटप्याने त्यांचे आत्ममनोबल वाढविणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण नऊ मार्च रोजी पुण्यात आढळून आला. त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढू लागली. त्यास जवळपास दोन महिन्यांहून अधिक कालावधी झाला. एप्रिल महिन्यात ही संख्येने हजाराचा आकडा गाठला. दिवसेंदिवस वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे महापालिका प्रशासनावरही त्याचा ताण वाढला. गेल्या दोन महिन्यापासून हा ताण वाढत चालला आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्यापासून ते अनेक खाते प्रमुख्यांचे मानसिक ताणामुळे वजन देखील कमी झाले. मात्र ताण काही कमी होण्यास तयार नाही. त्यातून कर्मचाऱ्यांचे आता मनस्वास्थ बिघडत चालले आहे. 

'ते' विद्यार्थी अडकले होते दिल्लीत, पण बार्टीने....

या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आता वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या ताणातून थोडा रिलिफ मिळावा, यासाठी मनःशांती शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पहिल्या टप्प्यात आयुक्त आणि सर्व खातेप्रमुख यांच्यासाठी दोन तासाचे या शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये ताण कमी करण्यासाठीचे उपाय, व्यायामाचे काही प्रकार, ध्यानधारणा, आदींचे मार्गदर्शन मनसृष्टी या संस्थेच्या वतीने देण्यात आले.त्यामुळे या तणावाच्या काळातही मनस्वास्थ ठेवून काम करणे आता प्रशासनाला शक्‍य होणार आहे.

विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If physical strength decreased then try for morale