पाणी पुरवठा बंद केल्यास पोलिसात जाईन : महापौर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे : "अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे चूकच असून असा अधिकार पाटबंधारे विभागाला नाही. पुन्हा जर अचानकपणे पाणीपुरवठा बंद केला तर पोलिसांत जावं लागेल", असा सज्जड दम महापौर मुक्ता टिळक यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना भरला.

पाटबंधारे विभागाने बुधवारी दुपारी अचानकपणे पुण्याला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही आक्रमक होत पाटबंधारे विभागाला जाब विचारण्याची भूमिका घेतली होती. मात्र जलसंपदाविभागाचे मुख्य अभियंता ता.ना. मुंडे आणि पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चोपडे यांनी स्वतःच महापालिकेत येऊन महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अचानकपणे तोडण्यात येणाऱ्या पाण्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी जाब विचारला. पाणी बंद करणारे पाटबंधारेचे अधिकारी या बैठकीत बचावात्मक पवित्र्यात पाहायला मिळाले.

या बैठकीच्या संदर्भात `सरकारनामा`शी बोलताना महापौर टिळक म्हणाल्या, "पुण्याला दररोज १ हजार ३५० एमएलडी पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिवाय आयुक्त सौरव राव यांच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासंदर्भात पत्रही पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. शिवाय पाणीकपात करायची असेल तर मुख्यमंत्री, जलसंपदा आणि पालकमंत्री यांच्या संमतीशिवाय कोणीही परस्पर निर्णय घेऊ नये, अशाही सूचना या बैठकीत दिल्या आहेत."

Web Title: if suddenly water supply will closed again, I will go to the police : Mayor