विशेष मुलांच्या शाळेत दुर्लक्ष; मुलीचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे : निवासी मतिमंद विद्यालयात ठेवलेल्या 16 वर्षांच्या विशेष मुलीच्या प्रकृतीकडे व देखभालीकडे संस्था चालविणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तब्येत खालावल्याने संबंधित मुलीचा उपचारादरम्यान करुण अंत झाला. संस्था चालविणाऱ्यांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : निवासी मतिमंद विद्यालयात ठेवलेल्या 16 वर्षांच्या विशेष मुलीच्या प्रकृतीकडे व देखभालीकडे संस्था चालविणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तब्येत खालावल्याने संबंधित मुलीचा उपचारादरम्यान करुण अंत झाला. संस्था चालविणाऱ्यांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी सायली सुनील हातेकर (वय 18, रा. बिबवेवाडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वैष्णवी अनिल हातेकर असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. फिर्यादी सायली यांची वैष्णवी ही चुलत बहिण आहे. वैष्णवी ही जन्मतः अपंग व मतिमंद असून तिला फिट येण्याचा आजार आहे. वैष्णवीची आजी सुगंधा व आई मीनाक्षी या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने घरातच झोपून आहेत. दोघींमुळे वैष्णवीची काळजी घेता येत नसल्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी वैष्णवीला धनकवडीतील अक्षरस्पर्श मतिमंत निवासी विद्यालयात काही दिवसांसाठी ठेवले.

संस्थेच्या संचालिका दिपाली निखळ यांच्याकडे वैष्णवीच्या गोळ्या-औषधे व दोन हजार रुपयांची रक्कम दिली. त्यानंतर एक महिन्याने निखळ यांनी दरमहा देण्यात येणारी 1500 रुपये मागण्यास सुरवात केली. त्यानुसार फिर्यादी व त्यांचा चुलतभाऊ संस्थेमध्ये पैसे देण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी वैष्णवीची भेट घेतली. तेव्हा वैष्णवी अशक्त झाल्याचे, तिच्या अंगावर मारहाण झाल्याचे व्रण आढळले, त्यामुळे त्यांनी तिला तत्काळ तिला घरी नेले. दरम्यान वैष्णवीला उलट्या होऊन ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

फिर्यादी यांच्या ओळखीच्या सामाजिक कार्यकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या कांचन दोडे यांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांच्यासह कीर्ती भंडगे व रजनी जोगदंड यांनी संस्थेची पाहणी केली. त्यावेळी तेथील अवस्था भयावह असल्याचे त्यांना आढळून आले. दरम्यान मंगळवारी सकाळी अकरा वाजता वैष्णवीचा मृत्यु झाला. वैष्णवीच्या प्रकृतीकडे व देखभालीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी फिर्यादी यांनी दिपाली निखळ हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

"वैष्णवीवर उपचार सुरू असताना आम्ही संबंधीत संस्थेत गेलो, त्यावेळी तेथील स्वयंपाक घर व स्वच्छतागृहातून प्रचंड दुर्गंधी येत होती. दोन खोल्यांमध्ये मुले-मुलींना अक्षरशः कोंडण्यात आले होते. त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मुलांना पुरेसे जेवनही दिले जात नसल्याचे काहींनी सांगितले.''
- कांचन दोडे

Web Title: Ignorance in special children's school; Daughter's death

टॅग्स