esakal | आयआयएम नागपूरचे उपकेंद्र पुण्यात
sakal

बोलून बातमी शोधा

आयआयएम नागपूर

आयआयएम नागपूरचे उपकेंद्र पुण्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्यवस्थापन क्षेत्रातील राष्ट्रीय संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचे (आयआयएम) उपकेंद्र पुण्यात सुरू करण्यात आले आहे. भोसरी येथीस सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) च्या संकुलात केंद्राची स्थापना करण्यात आली असून, व्यावसायिकांसाठी एमबीए-डब्ल्यूपी या अभ्यासक्रमाची घोषणाही यावेळी करण्यात आली.\

हेही वाचा: नारीच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

आयआयएम नागपूरच्या वतीने पत्रकार परिषदेत यासंबंधीची माहिती देण्यात आली. यावेळी आयआयएम नागपूरचे संचालक मंडळाचे अध्यक्ष सी.पी.गुरूनानी, संचालक डॉ. भीमराया मेत्री, सीआयआरटीचे संचालक डॉ. राजेंद्र सानेर पाटील आदी उपस्थित होते. गुरूनानी म्हणाले,‘‘आजही उद्योगांना ५३ टक्के कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग असून त्याला आयटी क्षेत्राचीही जोड आहे. डिजिटल युगाला अपेक्षीत व्यवस्थापनशास्त्रातील कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी हे उपकेंद्र पुण्यात कार्यरत होत आहे.’’ पुण्याबरोबरच भविष्यात हैदराबाद आणि सिंगापूरमध्येही उपकेंद्र सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. मेत्री यांनी सांगितले.

हेही वाचा: गणेशोत्सवानंतर मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवू

असा आहे अभ्यासक्रम ः

  • मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ः वर्किंग प्रोफेशनल

  • पात्रता ः पदवी पर्यंतचे शिक्षण आणि तीन वर्षाचा अनुभव

  • कालावधी - २ वर्षे (शनिवार, रविवार)

  • प्रवेश क्षमता ः ६०

  • प्रवेश अर्ज उपलब्ध होण्याची तारीख ः ८ सप्टेंबर

"कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना अद्ययावत व्यवस्थापन कौशल्य शिकविण्यासाठी आम्ही पुण्यात हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. लवकरच डेटा सायन्स आणि व्यवस्थापनासंबंधीचा अभ्यासक्रम सुरू करू. पुण्यातील उद्योगांच्या गरजेनुसार येथे संशोधन आणि व्यवस्थापनशास्त्रातील कुशल मनुष्यबळाची निर्मिती होईल."

- डॉ. भीमराया मेत्री, संचालक, आयआयएम नागपूर

loading image
go to top