esakal | गणेशोत्सवानंतर मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवू
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

गणेशोत्सवानंतर मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवू - मुख्यमंत्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना थेट कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. तसेच, गणेशोत्सवानंतर मराठा समाजातील संघटनांची बैठक घेउन सारथीसह मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती ‘शिवसंग्राम’कडून देण्यात आली.

हेही वाचा: नारीच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

शिवसंग्राम आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यभरात नुकतेच आंदोलन करण्यात आले.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवसंग्राम’च्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीला मराठा प्रश्नांबाबत नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण तसेच शिष्टमंडळातील आमदार मेटे यांच्यासह आमदार भारती लव्हेकर, प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, विक्रांत आंब्रे, राजन घाग, प्रफुल्ल पवार, ॲड. प्रकाश कारंडे, रूपेश मांजरेकर, विवेक सावंत आदी उपस्थित होते.

हेही वाचा: धक्कादायक;बहिणीची छेड काढली म्हणून डोक्यात दगड घालून हत्या;पाहा व्हिडिओ

बैठकीमध्ये मराठा समाजाच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. मराठा समाजातील प्रश्न विविध खात्यांशी संबंधित असल्यामुळे गणेशोत्सवानंतर पक्ष, मराठा संघटना, संबंधित मंत्री आणि प्रधान सचिवांसह पुन्हा बैठक घेऊन मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: कर्णबधिर जोडप्याची उद्योजकतेत ‘श्वेत’भरारी

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे न्या. गायकवाड आयोगातील त्रुटी दूर कराव्यात. राज्य मागासवर्ग आयोग पुनर्गठीत करण्यासह आरक्षण मिळण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सुविधा द्याव्यात. अण्णासाहेब पाटील महामंडळाला प्रत्यक्ष कर्ज देण्याचे अधिकार द्यावेत. सारथी संस्था कार्यक्षम होण्यासाठी नवे प्रकल्प सुरू करावेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भवन सुरू करण्याससह इतर विषयांवर बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, नगर जिल्ह्यातील कोपर्डी आणि रायगड जिल्ह्यातील तांबडी येथील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबातील एकाला नोकरी आणि आर्थिक मदत करण्याबाबत तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

loading image
go to top