
"द इंटरनॅशनल जेनेटिक इंजिनीअरड् मशिन' (आयजीईएम) नावाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाले आहे. त्यांनी अभिनव निदान पद्धत तर शोधली आहे, पण त्याचबरोबर नवीन औषधाच्या शोधातही ते सध्या आघाडीवर आहे.
Positive Story : आयसरचे विद्यार्थी शोधतायेत मलेरियावर औषध; मोबाईलवर करणार अचुक निदान
पुणे : हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या हिवतापावर नवीन औषध आणि अचूक निदान पद्धत शोधण्याचा शिवधनुष्य विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उचलला आहे.
"द इंटरनॅशनल जेनेटिक इंजिनीअरड् मशिन' (आयजीईएम) नावाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाले आहे. त्यांनी अभिनव निदान पद्धत तर शोधली आहे, पण त्याचबरोबर नवीन औषधाच्या शोधातही ते सध्या आघाडीवर आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काय आहे स्पर्धा ?
महाविद्यालयीन किंवा शालेय विद्यार्थ्यांमध्ये कृत्रिम जीवशास्त्राची (सिंथेटिक बायोलॉजी) प्रयोगशील ज्ञान मिळावे यासाठी 'आयजीईएम' ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी जनसामान्यांच्या थेट उपयोगात येणारे जीवशास्त्रीय संशोधन करायचे असते.
आयसरचा सहभाग काय?
2015 पासून आयसर पुणेचा संघ या स्पर्धेत सहभागी होत आहे. यावर्षीच्या स्पर्धेसाठी हिवतापाचे निदान आणि औषधावर संशोधन करत आहे.
हिवतापाचीच निवड का?
जगभरामध्ये हिवतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2018मधील आकडेवारीनुसार जगभरात 22 कोटी 80 लाख रुग्णांना हिवतापाची बाधा झाली होती. त्यापैकी चार लाख पाच हजार लोकांचा मृत्यू झाला होता. भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात पावसाळ्यात सर्वाधिक हिवतापाचे रुग्ण आढळतात.
आयसरची औषध निर्मिती?
हिवतापाला कारणीभूत "प्लास्मोडीअम फाल्सिपेरम' सुक्ष्मजीवाची निवड आयसरच्या विद्यार्थी संशोधकांनी केली. त्यातील प्रथिनांची मानवी शरिरासोबतची अभिक्रिया संशोधकांनी शोधली. तिला प्रतिबंध करण्यासाठी सायक्लोटाईड प्रथिन उपयुक्त असल्याचे संगणकीय संशोधनातून पुढे आले आहे. आता प्रत्यक्ष पुढील संशोधन कोरोनासंबंधीच्या नियमांची परवानगी मिळाल्यावर होणार आहे.
- आईसोबत बोलत थांबलेल्या तरुणावर हल्ला; तिघांनी लोखंडी सळईने केले वार
निदान पद्धतीवर संशोधन ?
हिवतापाचे अचूक निदानसाठी 'फोल्डस्कोप' या पेपर सुक्ष्मदर्शिकेचा वापर करण्यात आला आहे. आयसरच्या विद्यार्थी संशोधकांनी विकसित केलेल्या या संयंत्राद्वारे रक्त नमुन्यांच्या साहाय्याने हिवतापाचे निदान करण्यात येते. यासाठी विशेष संगणकीय सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यामुळे हिवतापाचे 97 टक्के अचूक निदान होते. ही व्यवस्था मोबाईल फोनमध्ये आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जेणेकरून दुर्गम खेड्यातही मोबाईलच्या साहाय्याने सहज हिवतापाचे निदान करता येईल.
यांनी केले संशोधन?
अब्दुल रशीद, अवधूत जाधव, चिन्मय पटवर्धन, गुणवंत पाटील, अक्षय कुन्नावली, अलीना जोसे, अनंथा एस. राव, अँथनी डेव्हिड, जतिन बेदी, लक्ष्मी श्रीराम, मर्रीन वेंकट, मिसाल बेदी, रुपल गेहलोत, साईलेश छिन्नराज या सर्व विद्यार्थ्यांना तेजश्री कानिटकर, विनायक तुममुली, कृष्णेंदु रॉय, राशिम म्हलोत्रा, अनिरुद्ध पिल्लई आणि प्रा. संजीव गलांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
''ही गाडी मूळ मालकाला परत द्या'', चोरलेल्या स्कॉर्पिओत चोरट्यांचा 'मेसेज'