

Delhi Air pollution
- प्रज्वल रामटेके
पुणे - दिल्लीतील हवेची गुणवत्ता आणि वाढते प्रदूषण हे केवळ वाहने किंवा कारखान्यांच्या धुरापुरते मर्यादित नाही, तर त्यावर हवामानातील गुंतागुंतीचे बदल अत्यंत निर्णायक परिणाम करतात. विशेष म्हणजे, हवामानात अचानक झालेला बदल किंवा तापमानातील चढ-उतार प्रदूषणावर त्वरित परिणाम करत नाहीत, तर त्याचा प्रभाव तब्बल ५१ तासांच्या विलंबाने दिसून येतो.