

Climate Concern: IITM Flags Pollution-Driven Temperature Surge in Delhi and Punjab
sakal
पुणे: दिल्ली, पंजाब आणि हरियाणासह संपूर्ण उत्तर भारतात वाढणाऱ्या प्रदूषणाचा विळखा केवळ जमिनीपुरता मर्यादित राहिलेला नाही. या राज्यांमधून बाहेर पडणारे घातक विषारी वायू मॉन्सूनच्या वाऱ्यांसोबत थेट पृथ्वीच्या वरच्या वातावरणात पोहोचत असून, तिथे ‘ओझोन वायू’ची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरत आहेत. परिणामी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.