पांगरी पोलिसांकडून अवैध बिअर साठा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पांगरी पोलिसांकडून अवैध बिअर साठा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
Published on

पांगरी पोलिसांकडून
अवैध बिअरसाठा जप्त

पांगरी, ता. १७ : गोरमाळे-जामगाव रस्त्यावरील नागोबा देवस्थान परिसरात सुरू असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर बेकायदा बिअरचा साठा करून ठेवलेल्या महिलेविरुद्ध पांगरी पोलिसांनी कारवाई केली. रविवारी (ता. १६) सकाळी सुमारे ११.२० वाजता केलेल्या कारवाईत विविध कंपन्यांच्या ९८ सीलबंद बिअर बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यांची एकूण किंमत १९ हजार ६०० रुपये आहे.
गोरमाळे येथे नागोबा देवस्थानची यात्रा सुरू असताना गर्दीचा फायदा घेऊन बेकायदा बिअरचा साठा केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक साईनाथ सुरवसे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोरमाळे-जामगाव रोडवरील एमएसईबी परिसरात सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत जयश्री गोरख शिंदे (वय ३९, रा. गायरान वस्ती, ईटकुर, ता. कळंब) हिच्याकडे कोणताही अधिकृत परवाना किंवा परमिट नसताना बिअरचा साठा आढळून आला. पोलिसांनी ६५० मिली क्षमतेच्या ६१ बाटल्या (किंमत १२ हजार २०० रुपये) तसेच ३७ बाटल्या (किंमत ७ हजार ४०० रुपये) असा एकूण १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल बळीराम तुकाराम बेदरे यांच्या फिर्यादीवरून पांगरी पोलिस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com