पिंपरीमध्ये अवैध धंदे जोरात

संदीप घिसे
सोमवार, 7 मे 2018

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शहरातील आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे ३० मटका आणि पत्त्याचे क्‍लब सुरू असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

शहरातील गुन्हेगारी वाढण्यास हे वातावरण पोषक ठरत आहे. 

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शहरातील आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे ३० मटका आणि पत्त्याचे क्‍लब सुरू असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

शहरातील गुन्हेगारी वाढण्यास हे वातावरण पोषक ठरत आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून, वाहनचोरी, घरफोडी, लूटमार, हाणामाऱ्या, या घटना नित्याच्या आहेत. 
मात्र, ही गुन्हेगारी थांबवण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. शहरातील बहुतांश भागातील हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विकली जाते. भर रस्त्यावर तळीराम ठाण मांडतात. हिंजवडी आणि वाकड परिसरात काही ठिकाणी हुक्‍का पार्लर सुरू आहेत. अशा अवैध धंद्यांची उलाढाल दरमहा अंदाजे ३० कोटी असल्याचे समजते.

ग्रामीण हद्दीचा गैरफायदा
पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत. निगडी जकात नाका आणि मोशी टोल नाका या ठिकाणी मटक्‍याचे अड्डे सुरू आहेत. शहर पोलिस कारवाईसाठी आल्यास आम्ही ग्रामीणच्या हद्दीत असल्याचे सांगितले जाते, तर ग्रामीणच्या पोलिसांकडे शहर हद्दीचे कारण पुढे केले जाते. अशाप्रकारे अवैध धंदेवाले कारवाईतून सुटका करून घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शहरात लपून धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर तिथे नियमित कारवाई केली जाते.
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त

येथे सुरू आहेत अवैध धंदे ?
सांगवी - १) काटे पेट्रोल पंपाजवळील सोसायटीच्या मागे २) पिंपळे सौदागरमधील इंग्लिश मीडियम शाळेजवळील गोठ्यात ३) वैदूवस्ती, पिंपळे गुरव येथील देशी दारूच्या दुकानाजवळ ४) रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ, ६० फुटी रोड ५) वैदूवस्ती, आदीयाल यांच्या कार्यालयाजवळ ६) पिंपळे निलख नदी किनारा 
वाकड - १) रहाटणी फाटा-काळेवाडी रोड  २) सोळा नंबर बस थांबा 
३) प्रेरणा बॅंकेजवळ, डांगे चौक ४) बास्केट ब्रीजजवळ, पुनावळे 
५) कुणाल हॉटेलसमोर
हिंजवडी - १) म्हाळुंगे चौक, राधा हॉटेलच्या मागे २) भूमकर चौक, वाकड ३) शिवाजी चौक, हिंजवडी 
भोसरी - १) वायसीएमच्या मागील झोपडपट्टीत २) शिवसेना कार्यालयाजवळ, दापोडी ३) दापोडी रेल्वे गेटजवळील लॉटरी दुकानात
चिंचवड - १) चिंचवड रेल्वे स्टेशन २) बिजलीनगर
एमआयडीसी - १) गवळीमाथा-शांतिनगर दरम्यान मोठा पत्त्याचा क्‍लब
पिंपरी - १) नेहरूनगर २) भाटनगर ३) वल्लभनगर लॉटरी सेंटरमध्ये
निगडी - १) पेरूची बाग, ओटास्कीम, निगडी २) निगडी पुलाखाली-लॉटरी सेंटरमध्ये

Web Title: Illegal businesses going on in Pimpri