MHADA News : सार्वजनिक जागेत अनधिकृत बांधकाम करून व्यवसायाकरिता म्हाडाच्या घराचा गैरवापर

अनेकदा तक्रार व पाठपुरवठा करून ही म्हाडा अधिकारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्याचे काम करत असल्याची तक्रार
illegal construction encroachment mhada house scam police pune
illegal construction encroachment mhada house scam police pune esakal

Pune News : सार्वजनिक जागेत अनधिकृत बांधकाम करून व्यवसायाकरिता म्हाडाच्या घराचा गैरवापर होत असल्याने अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहे. अनधिकृत वास्तव्य, अतिक्रमित बांधकाम तसेच गाळ्यांचा गैरवापर केल्यास, म्हाडा अक्ट १९७६, कलम ९५ वे अन्वये तडकाफडकी कारवाई करण्याचा अधिकार मिळकत म्हाडा व्यवस्थापक यांना आहे.

अनेकदा तक्रार व पाठपुरवठा करून ही म्हाडा अधिकारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्याचे काम करत असल्याची तक्रार रहिवासी राजेश बेल्हेकर यांनी सकाळ कडे केली आहे. महर्षीनगरनगर येथे म्हाडाच्या इमारतीत ६३/४९६ येथे सुखदेव कॅटरर्स या नावाने मोठ्या प्रमाणात केटरिंग व मंगल केंद्राचा व्यवसाय बेकायदेशीरीत्या चालविला जात आहे.

सदर जागेत व्यवसायासाठी सुमारे ५० ट्रकभर सामान ठेवून सार्वजनिक जागेचा रस्ता बळकावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. यावेळी ४० ते ५० हायप्रेशर व छोट्या मोठ्या गैस शेगड्या, ३० ते ४० गैस सिलेंडर, गाद्या, उश्या, चादरी, प्लास्टिक, ताटे वाट्या, पाण्याकरिता प्लास्टिकचे मोठे जार असे अत्यंत ज्वालागृही साहित्य समाविष्ट आहे.

सदर सामान अत्यंत धोकादायक पद्धतीने वापरात आहे. तसेच पहाटे ५ ते रात्री १० वा. पर्यंत उशिरा अन्न शिजवून ते वितरीत करण्याचे काम करण्यात येत आहे. सामान ने आण करण्यासाठी सतत छोट्या मोठ्या टेम्पो, ट्रक या वाहनांची वर्दळ सुरु असल्याने रहीवाशांना येण्या जाण्याकरिता कायम त्रासाला सामोरे जावे लागत असते.

illegal construction encroachment mhada house scam police pune
Pune Traffic: मुंबई बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प; नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

परिणामी परिसरात वाहतुकीची कोंडी हि मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच सदर ठिकाणी राहणारे व कामानिमित्त ये जा करणारे कामगार, परप्रांतीय मजूर अपरात्री मद्यपान करत असतात. पहाटेपासून ते रात्रभर त्यांचा गोंधळ सुरु असतो.

त्यामुळे रात्री झोपेची शांतता भंग होत असते. खरकटे अन्न व कचऱ्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून उंदीर व घुशींचा वावर सुरु झाल्याने ड्रेनेज लाईन तुंबण्याच्या समस्या निर्माण होत आहे. या भाडेकरूने पुणे शहर पोलिसांकडून गॅस सिलेंडर साठा करण्यासाठी एलपीजी साठा ना-हरकत दाखला फाॅर्म पी, तसेच अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र घेतलेले नाही. पुणे महापालिका अग्नी शमन दलाकडुन ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.

illegal construction encroachment mhada house scam police pune
Pune Research News : टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानातून ‘थारपारकर’ कालवडीचा जन्म

याप्रसंगी रहिवाशांनी म्हाडाकडे वारंवार तक्रारीचे अर्ज दाखल केले असून सदर जागेचा मालक शिवराज ज्ञानदेव मोटे यांना म्हाडा कार्यालयातून अनधिकृत व अतिक्रमित बांधकाम काढून टाकण्यासाठी अंतिमरीत्या नोटीस हि बजावण्यात आली होती.

अन्यथा कारवाई करण्यात येईल असे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले. यावेळी ३० भरलेले एलपीजी गॅस सिलेंडर व आदी ज्वलनशील पदार्थ बेकायदेशीररित्या साठा केल्याने लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची तक्रार रहिवाशांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल केली.

illegal construction encroachment mhada house scam police pune
Pune Dam Water Level : पुण्यातील चार धरणांचा पाणीसाठा १० ‘टीएमसी’वर

प्रसंगी पोलिसांनी केटरर्सचे चालक सुखदेव वैष्णव यांच्यावर हयगयीचे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत जुजबी कारवाईचा देखावा केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पुन्हा त्या जागेत राजरोस पणे व्यवसाय सुरु केल्यामुळे जागा मालक मोटे यांचेसह सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून सदर मिळकत म्हाडाने जप्त करावी अशी मागणी बेल्हेकर यांनी केली आहे.

महर्षीनगर पोलीस आरोपींची सरकारी पाठराखण करत असल्याने याठिकाणी कोणत्याही क्षणी मोठी आग लागून फार मोठी जिवित व वित्त हानी होण्याची भीती ही तक्रारदार व्यक्त करत आहेत.

या संबधित म्हाडाचे मुख्यधिकारी अशोक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, नियोजन प्राधिकरण महानगरपालिका आहे त्यामुळे कारवाई करण्याचे अधिकार मनपाचेच आहे. आम्ही याविषयी मनपाच्या संपर्कात आहोत.

illegal construction encroachment mhada house scam police pune
BJP Pune : अखेर पुण्यात खांदेपालट! भाजपच्या शहराध्यक्षपदी 'या' नेत्याची वर्णी

मी स्वतः जाऊन अतिरिक्त आयुक्तांना भेटून संबधित केटरर्सवर कारवाई करण्याकरिता पत्रव्यवहार केला आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना माझ्या समक्ष सूचना दिल्या होत्या. याप्रसंगी मनपाची आम्हाला मदत लागणार असून मनपाकडून ज्या दिवशी तारीख मिळेल त्या दिवशी आम्ही एकत्र मिळून कारवाई करू, असे पाटील यांनी सांगितले.

महर्षीनगर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी एस जमदाडे म्हणाले कि, आम्ही संबधित केटरर्स चालकावर गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. परंतु म्हाडाने ही कारवाई करणे सध्या अपेक्षित आहे. तरी देखील या तक्रारीची दाखल घेत पुन्हा कारवाई करणार असल्याचे जमदाडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com